भारतरत्न या पुरस्काराबद्धल भारतीयांच्या मनात अनंत आदर आहे, अणि तो ज्या व्यक्तींना मिळतो, त्यांच्याबद्दलसुद्धा. आतापर्यंत हा पुरस्कार दैदिप्यमान कामगिरी करणार्यांनाच दिला गेला, पण श्री लालकृष्ण अडवाणींनी एक अनिष्ट वळण दिले, आणि श्री. अटलबिहारी वाजपेयींच्या नावाची शिफारस केली, हा सुद्धा विचार केला नाही कि, पक्षाच्या कामगिरीच्या कसोटीवर पुरस्कार मागावा का? झाली छोटीशी ठिणगी पडली, आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा साक्षात्कार झाला आणि त्यांचे नेते थोर वाटू लागले म्हणजे आता जो पक्ष मोठा त्याच्याकडेच हा पुरस्कार जाणार. मधमाशांचे मोहोळ उठवण्यापलिकडे त्यांना काय काम आहे काय? खरी गंमत तर पुढेच आहे, ज्यांचे कुणाचे नाव सुचवले, ते मात्र मूग गिळून गप्पच आहेत, मिळाला तर ’भारतरत्न’ पुरस्कार मिळेल, मग नंतर मानभावीपणाने मिरवणार, मी कुठे मागितला होता. आता अशीच परिस्थिती अन्य पुरस्कारांच्या बाबतीतही निर्माण होणार. मग काय आहेतच, जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल. कोर्टाचा निम्मा वेळ तर या याचिका चालविण्यातच जाणार. आणि बिचारे कितीतरी कच्चे कैदी केवळ खटले चालत नाहीत म्हणून कैदेत खितपत पडलेले आहेत.
आतापर्यंत भारतरत्न मिळालेल्यांची यादी पहा, आणि करा तुलना या साळसूदपणे भारतरत्न मागणार्यांची.
BHARAT RATNA AWARDEES LIST : भारतरत्न मिळालेल्यांची यादी.
1) Kumari Lata Dinanath Mangeshkar - Arts : 2001 कुमारी लता मंगेशकर - २००१
2) Late. Ustad Bismillah Khan - Arts : 2001 उस्ताद बिस्मिल्ल्ला खान - २००१
3) Prof. Amartya Sen - Literature & Education : 1999 प्रा. अमर्त्य सेन - १९९९
4) Lokpriya Gopinath (posth.) Bordoloi - Public Affairs : 1999 लोकप्रिय गोपिनाथ बोरडोली - १९९९
5) Loknayak Jayprakash (Posth.) Narayan - Public Affairs : 1999 लोकनायक जयप्रकाश नारायण - १९९९
6) Pandit Ravi Shankar - Arts : 1999 पं. रवीशंकर - १९९९
7) Shri Chidambaram Subramaniam - Public Affairs : 1998 श्री. चिदंबरम् सुब्रमणियम् - १९९८
8) Smt. M.S. Subbulakshmi - Arts : 1998 श्री. एम्. एस्. सुब्बलक्ष्मी - १९९८
9) Shri (Dr.) A.P.J. Abdul Kalam - Science & Engineering. : 1997 श्री.(डॉ.) ए. पी. जे. अब्दुल कलाम- १९९७
10) Smt. Aruna Asaf (Posth.) Ali - Public Affairs : 1997 श्री. अरूणा असफ अली - १९९७
11) Shri Gulzari Lal (Shri) Nanda - Public Affairs : 1997 श्री. गुलझारीलाल नंदा - १९९७
12) Shri Jehangir Ratanji Dadabhai Tata - Trade & Industry : 1992 श्री. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा - १९९२
13) Shri Maulana Abul Kalam Azad - Public Affairs : 1992 श्री. मौलाना अबुल कलाम आझाद - १९९२
14) Shri Satyajit Ray - Arts : 1992 श्री. सत्यजीत राय - १९९२
15) Shri Morarji Ranchhodji Desai - Public Affairs : 1991 श्री. मोरारजी रणछोडजी देसाई - १९९२
16) Shri Rajiv Gandhi - Public Affairs : 1991 श्री. राजीव गांधी - १९९१
17) Sardar Vallabhbhai Patel - Public Affairs : 1991 सरदार वल्लभभाई पटेल - १९९१
18) Dr. Bhimrao Ramji Ambedakr - Public Affairs : 1990 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर - १९९०
19) Dr. Nelson Rolihlahla Mandela - Public Affairs : 1990 डॉ. नेल्सन मंडेला - १९९०
20) Shri Marudur Gopalan Ramachandran - Public Affairs : 1988 श्री. मरुधर गोपालन रामचंद्रन - १९९८
21) Khan Abdul Ghaffar Khan - Social Work : 1987 : Pakistan : खान अब्दुल गफारखान - १९८७
22) Shri Acharya Vinoba Bhave - Social Work : 1983 : India : Maharashtra श्री. आचार्य विनोबा भावे - १९८३
23) Mother Mary Teresa Bojaxhiu Teresa - Social Work : 1980 मदर मेरी तेरेसा - १९८०
24) Shri Kumaraswamy Kamraj - Public Affairs : 1976 श्री. कुमारस्वामी कामराज - १९७६
25) Shri V.V. Giri - Public Affairs : 1975 श्री. व्ही.व्ही.गिरी - १९७५
26) Smt. Indira Gandhi - Public Affairs : 1971 श्रीमती इंदिरा गांधी - १९७१
27) Shri Lal Bahadur Shastri - Public Affairs : 1966 श्री. लाल बहादूर शास्त्री - १९६६
28) Dr. Pandurang Vaman Kane - Social Work : 1963 डॉ. पांडुरंग वामन काणे - १९६३
29) Dr. Zakir Hussain - Public Affairs : 1963 डॉ. झाकीर हुसेन - १९६३
30) Dr. Rajendra Prasad - Public Affairs : 1962 डॉ. राजेंद्र प्रसाद - १९६२
31) Dr. Bidhan Chandra Roy - Public Affairs : 1961 डॉ. बिधान चंद्र रॉय - १९६१
32) Shri Purushottam Das Tandon - Public Affairs : 1961 श्री. पुरुषोत्तम दास टंडन - १९६१
33) Dr. Dhonde Keshav Karve - Social Work : 1958 डॉ. धोंडो केशव कर्वे - १९५८
34) Pt. Govind Ballabh Pant - Public Affairs : 1957 पं. गोविंद वल्लभ पंत - १९५७
35) Dr. Bhagwan Das - Literature & Education : 1955 डॉ. भगवान दास - १९५५
36) Shri Jawaharlal Nehru - Public Affairs : 1955 श्री. जवाहरलाल नेहरू - १९५५
37) Dr. M. Vivesvaraya - Civil Service : 1955 डॉ. एम्. विश्वेश्वरय्या - १९५५
38) Shri Chakravarti Rajagopalachari - Public Affairs : 1954 श्री. चक्रवर्ती राजगोपालाचारी - १९५४
39) Dr. Chandrasekhara Venkata Raman - Science & Engineering. : 1954 डॉ. चंद्र्शेखर वेंकट रामन - १९५४
40) Dr. Sarvapalli Radhakrishnan - Public Affairs : 1954 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् - १९५४