बाळाची नाळ भाग-१

ज्यावेळी नविन बाळाच्या आगमनाची चाहूल लागते,तेव्हापासूनच  होणाऱ्या आईवडिलांना बाळाच्या भविष्याची काळजी वाटण्यास सुरुवात होते.त्याप्रमाणॆ ते सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे बाळासाठी पैसे वेगळे साठवायला सुरुवात करतात.याचप्रमाणे बाळाला उपयोगी पडेल अशी एक महत्वाची ठेवण आजच्या काळात पुढे आली आहे. ती म्हणजे जन्म झाल्या झाल्या बाळाच्या नाळेतल रक्त (Cord blood) साठ्वायची. जरी सगळे आईवडिल अजुन ह्या ठेवणीवरती फारसे लक्ष देत नसले तरी हि पदधत काळाची गरज बनत चालली आहे असे म्हट्ले तर वावगं ठरणार नाही.

बाळाच्या नाळेतल रक्त (Cord blood)  म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय?

बाळाच्या जन्मानंतर कापलेल्या नाळेचा जो भाग वारेला(placenta)  जोडून असतो,त्या भागातून जे रक्त घेतल जातं, त्याला नाळेतल रक्त (Cord blood) म्हणतात. साधारणपणे प्रसुतिनंतर हे रक्त वाया जातं. पण संशॊधनाने हे दिसुन आले आहे कि ह्या रक्तात मूळ पेशी (stem cell) असतात. मूळ पेशी ह्या अशा पेशी असतात ज्यांचे  शरीरातल्या सर्व पेशी, अवयव व अवयव संस्थांत वर्गीकरण होवू शकते.आपले शरीर मूळपणे ह्या पेशींनी बनलेले असते त्यामुळे कुठ्ल्याहि शरीरातल्या बिघाडात ह्या पेशींचा उपयोग होतो. ह्या पेशी भ्रूण(embryo),१-३ महिन्यांच्या गर्भातून(fetal), अस्थिमज्जातून(bone marrow) ,बाळाच्या नाळेमधुन मिळ्तात. ह्यापैकी पहिले दोन प्रकार अनैतिक समजले जातात. अस्थिमज्जातून मिळणाऱ्या मूळ पेशींवर शरीरातल्या वातावरणाचा परिणाम झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येते.त्यामुळे बाळाच्या नाळेतुन  मिळणाऱ्या मुळ पेशींना फार महत्व आहे.

भविष्यात बाळालाच नव्हे तर आई,वडिल,भावंड आणि नातेवाईकांना ह्या पेशींचा उपयोग होवू शकतो.जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त रोगांचा ह्या पेशी वापरुन इलाज करता येतो. बऱ्याच प्रकारचे कर्करोग,अस्थिमज्जाचे रोग,रक्ताचे रोगांवर ह्या पेशी रामबाण उपाय ठरु शकतात.

Rohini Khapre - Ghawalkar

No comments: