नाळेतल रक्त घ्यायची पद्धत
हि एक सोपी,सुरक्षित आणि वेदनारहित पद्धत आहे. प्रसुतीनंतर लगेचच हे करावे लागते. ह्या पद्धतीसाठी लागणार सामान नाळेतल रक्त जमा करणाऱ्या बॅंकाकडून उपलब्ध होते.अशा अनेक बॅंक सध्या आहेत,त्याबद्दल माहिती नंतर पाहू. नैसर्गिक प्रसुतीनंतर कापलेल्या नाळेला दोन्ही बाजुला चिमटे लावले जातात. हे काम तुमचा doctor, midwife किंवा nurse करते. नंतर एका बाजुचा चिमटा काढून syringe किंवा tube च्या साहाय्याने नाळेतील रक्त जमा केले जाते. जमा केलेले रक्त लगेचच बॅंकेकडे पाठवले जाते. C-section झालेल्या प्रसुतीत थोडी वेगळी पद्धत अवलंबतात. पण ह्या पद्धतीत कमी रक्त मिळते. बॅंकेकडे पाठवलेल्या नाळेतल्या रक्तातून मुळ पेशी वेगळया केल्या जातात आणि त्यांना लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवले जाते.
जरी हा सर्व प्रकार फार उपयुक्त असला आणि याचे फायदे असले तरी काही कमतरता व अनुत्तरीत प्रश्न आहेत ज्यामुळे या पद्धतीबद्दल मनात शंका उत्पन्न होतात.
१. सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्या रक्ताचा उपयोग बाळ किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला अशा रोगांमध्ये होवू शकतो ज्यात अस्थिमज्जा(bone marrow) बदलायची गरज असते.
२. पण हि नेहमीची पद्धत नसल्याने फार आधीपासुन सर्व तयारी करावी लागते.
३. सर्वसाधारणपणे काहिही धोका नसलेल्या बाळाला याचा कित्पत उपयोग होइल हे अजून माहित नाही.
४.रक्त जमा करण्याचा आणि बॅंकेत ठेवायचा खर्च थोडा जास्त आहे.
५. बऱ्याचवेळेला ह्या मुळ पेशी लहान मुलांसाठी वापरल्या जातात. पण मोठ्यांसाठी नाळेच्या रक्तातून मिळणाऱ्या पेशी पुरेश्या नसतात. ह्या बाबतीत बरेच वाद आणि संशोधन सुरु आहे.
६. नातेवाईकाच्या मुळ पेशी अनोळखी माणसाच्या मुळ पेशींपेक्षा जास्त उपयुक्त असतात,हे अजुन सिद्ध व्हायचं आहे.
७. स्वतःच्या मुळ पेशी स्वतःला वापरण्याचे फारसे प्रयोग अजुन झालेले नाहीत. काहिजणांच्या मते ज्या आजारी बाळाला स्वतःच्या मुळ पेशी दिल्या जातात, त्यांना तेच रोग परत व्हायचा धोका असतो.
८. नाळेतील रक्त घ्यायच्या पद्धतीत बाळ आणि आईला धोक्याची संभावना अगदी कमी असली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. जर नाळेला बाळ जन्मल्यावर लगेच चिमटा लावला तर जमा होणार रक्त वाढू शकत,ज्याचा परिणाम बाळ अनिमीक व्हायची भीति असते.
1 comment:
Hi, I'm ashu
Post a Comment