पहिली doctor भेट हा सुखद अनुभव असतो. इथे सगले doctor group मध्ये काम करतात. बऱ्याच ठिकाणी एक मोठा doctor आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या Midwife असतात. Midwife म्हणजे आपल्याकडची सुईण असते. त्यांना हे काम करायचं license असतं. त्यांचा अनुभव भरपुर असतो, त्यामुळे बराच फायदा होतो आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या deliveryच्या वेळी ती पुर्णवेळ तुमच्या बरोबर असते. बरेचजण म्हणुन Midwife ला पसंदी देतात.
तुम्ही जेव्हा doctor कडे जाता तेव्हा तो doctor जर नसेल तर दुसरा doctor तुम्हाला बघु शकतो(अर्थात तुम्हाला चालत असेल तर). सर्वप्रथम तुम्हाला एका खोलीत बसवलं जातं. खोली म्हणजे तपासायच्या सर्व साधनांनी भरलेली छोटसं cabin असतं. एखादी नर्स येवुन तुमचं वजन, रक्तदाब बघून लिहून जाते. त्यानंतर तुमची urine test करुन pregnancy नक्की करते. आता तुमची midwife येते. येतानाच चेहऱ्यावरती छान हसु असतं.ती अगदी प्रेमात तुमच नाव विचारते. बऱ्याचवेळा पहिल्याच प्रयत्नामध्ये नाव काहितरी विचित्र उच्चारल जातं. पण लवकरचं ते पण जमून जातं. Midwife तुम्हाला पुर्ण तपासते. बरेचसे प्रश्न तुमच्या भरलेल्या form प्रमाणे विचारते. तुम्ही Pap test केली नसेल तर त्यावेळी करायला लावते. तुम्हाला काय काय त्रास होतो, ते लिहून घेते. यानंतर तुम्हाला pregnancy बद्द्ल खोलवर माहिती देते.अगदी तुमचं खाण-पिण, व्यायाम,घ्यावयाची काळजी,तुमच वजन वाढायचं प्रमाण सगळं सांगते. त्यानंतर गरज असणाऱ्या तपासण्यांसाठी रक्त घेतले जाते. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या vitamin tablets दिल्या जातात. तुम्हाला कुठल्या गोळ्या आवडतात किंवा कुठल्या गोळ्या तुम्हाला घेताना त्रास होत नाही, हे ठरवणं हा एकच उद्देश असतो. तुम्हाला बरीचशी pregnancy ची पुस्तके, महत्वाच्या फोन नंबरची यादी वगैरे गोष्टी दिल्या जातात. एक महिन्यानंतरची पुढ्ची भेट ठरवली जाते आणि पहिली doctor भेट संपते.
No comments:
Post a Comment