दिनांक २५ मे च्या वर्तमानपत्रात एक अतिशय महत्वाची बातमी लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे डॉ. रमेश भोंडे आणि डॉ सतीश पत्की यांनी शोध निष्कर्ष काढला की, मानवाला वरदान ठरलेल्या मूळ पेशी (स्टेम सेल्स) मातेच्या दुधात असतात. आणि या मूळ पेशींच्या सहाय्याने बालमृत्यु रोखता येतील. हा त्यांचा शोध ’ह्युमन सेल’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने स्वीकारला आहे.
यात अतिशय महत्वा गुणधर्म आढळला, की या मूळ पेशींचे विभाजन होते. आणि या पेशी तरंगतात. आईच्या दुधातील मूळ पेशींचा वापर करून स्वादुपिंडाच्या पेशी, मेंदूतील चेतातंतू आणि हाडातील निर्मीती करण्यात यश येईल.
मूळ पेशींचा अर्थ असा, मूळ पेशींमध्ये अमर्याद काळपर्यंत विभाजन होण्याची क्षमता असते. त्या शरीरातील कोणत्याही अवयवातील पेशींमध्ये परावर्तित होतात. वाढत्या वयामुळे मूळा पेशींची संख्या कमी होते, तेव्हा या पेशी त्याठिकाणी पुन्हा रोपण करता येतील. असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. स्टेम सेल्स चिरंतन असतात.
अजून एक महत्वाचा शोध म्हणजे, शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या पेशीची निर्मिती केली. शिवाय त्या पेशींचे विभाजनही होते.