सर्व पास

भारतात केंद्र सरकारने एक कायदपास केला, या वर्षी पासून आठवीपर्यंत कोणाही विद्यार्थ्याला नापास करायचे नाही. आणि या वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कोणाच्या डोक्यात असले खूळ येते कोण जाणे. याचे भविष्यात किती गंभीर परिणाम होतील याची कोणीच कशी दखल घेत नाही? आठवी पर्यंत परिक्षा नाही म्हणजे कोण अभ्यास करील. शिक्षक कशाला गंभीरतेने  शिकवतील? आणि पालक काय आनंदीच. पण तोच विद्यार्थी नववीला आला तर त्याला नववीचा अभ्यासक्रम झेपेल काय? मग तेव्हा परिक्षेत नापास होणार्‍या  मुलांचे काय? दहावीचे काय? या निर्णयाचे समर्थन करताना सांगण्यात येते की, विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करताहेत, अरे, हे काय कारण झाले? आत्महत्या का करतात याचे कारण शोधून काढले पाहिजे. जर उद्या दहावीच्या मुलांनी आत्महत्या केल्यातर दहावीची परिक्षा रद्द करणार काय? आम्ही मागे एकदा येथेच ब्लॉग मध्ये म्हटले होते की, दहावीच्या परिक्षेत कोणालाही नापास करायचे नाही. सर्वजण पास. ज्याला जसे मार्क मिळतील तसा त्याचा फायदा होईल. आणि बघा आमची भविष्यवाणी खरी ठरायची वेळ आली आहे.

अशा जर परिक्षा न होऊ लागल्या तर आपण स्पर्धेपासून मुलांना लांब ठेवत आहोत, आणि मग त्यांना जागतिक स्पर्धेत आपण कसे उतरवणार? यामुळे आपण एकच, नाहीतर भविष्यातील सर्व पिढ्या बरबाद करत आहोत याचे जाणीव कोणालाही नाही, अगदी पालकांनाही नाही. या देशातील विध्यार्थ्यांचे दुर्दैव दुसरे काय! काही दिवसानंतर शाळा ही संकल्पनाच भारतातून नष्ट होऊ नये म्हणजे मिळवले.

Unknown

No comments: