भारतात बाबा, ताई, माई, अक्का, कालीबाबा, बंगाली बाबा खूप मोठा धंदा करतात. कारण त्यांच्या मागे धावणारे भारतात खूप आहेत. लोकांना जरा त्रास झाला तर आहेच सल्ला देणारे. गंडा, तावीज, यंत्र, लिंबू कचर्याच्या किमतीमध्ये घेऊन खूप भारी किंमतीला देतात. लोकांना हे कळत नाही की, जे हे सर्व सांगतात त्यांचे पूर्वायुष्य कोणी पाहिले आहे काय? त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय? पण लोकांना एवढे प्रश्न असतात त्यापुढे बाकी कोण विचार करतो. पोलीस, सरकारी कर्मचारी, शिक्षणसंबंधी लोक सुद्धा या मागे असतात.
असे प्रश्न ज्या ठिकाणी पाहिले जातात, त्याला देव्हारा म्हणतात. अशा ठिकाणी एक भगत बसतो, त्याच्या अंगात येते किंवा तो कवड्या टाकून प्रश्न विचारतो, मग काय पैशाची लूटच. अशा प्रकारचे देव्हारे एकट्या पुण्यात जवळ जवळ पाच हजार असावेत असा अंदाज आहे. आणि त्यात वर्षाला अंदाजे करोड रूपयाची उलाढाल होत असावी अंदाज आहे. त्यात सुद्धा ज्युनियर सिनीयर असतात. त्यांचा सुद्धा एक मोठा गुरू असतो. _______
बाकी सविस्तर पुढे पाहू यात.
1 comment:
Whatever you say but you have done a great work. I wish you great success being a Marathi. I am ready to translate the stories in English please tell me how can I proceed. - Sachin, Tiroda(India)
Post a Comment