आकाश मेहता, माझा बालपणीपासुनचा मित्र. एकत्र शिकलॊ, खेळलो, आयुष्यात आपापल्या पायावर उभे राहीलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा माझा मित्र, आम्ही मात्र विनाचमच्याचे. प्लास्टीकचे त्यावेळी प्रस्थ नव्हते, नाही तर मी पांढरा चमचा घेऊनच आलो असतो. मी परिस्थिती बघून संगणकी शिकलो. तो मात्र builder and jeweler झाला. व्यवसायाच्या बोटाला धरुन अमेरीकेत आलो. सुटीला भारतात गेलो की नेहमी भेटतो. आम्ही दिवस-रात्र एकत्र असतो. मागे अशाच एका सुटीला त्याचा वाढदिवस होता. पार्टी पुण्याच्या एका आलिशान pub मध्ये होती. pub मध्ये पैसा उडवण्याएवढे कमवायला लागलो तर अमेरीकेत आलो त्यामुळे आयुष्यात भारतीय pub बघायची संधी प्रथमच. पार्टी झकास होती. अमेरीकेतल्या pub प्रमाणे कमी कपड्यातल्या आणि दारुच्या नशेतल्या मुली तिथेही. अजुन लग्न झाले नव्हते. त्यामुळे ते कायम एक प्रोत्साहन असायचे. इंग्रजी गाणी आणि त्यावर थरकणारे बघुन मी पण हलत होतो. आकाशला म्हटले, अरे हिंदी लावा रे. तो आणि आणखी चार जणांचा चेहरा उतरला जणू काहि सगळेजण म्हणत होते "न जाने कहां कहां से चले आते हैं।". शेवटी माझ्यासाठी आकाशने "It's the time to disco" लावायला लावले.
नेहमी भारतात जातो आणि घाबरतो. गावाकडे दहावी पास झाल्यावर मुंबई बघायला आलेल्या मुलासारखी माझी अवस्था होते. नवे रस्ते flyovers हे सारे ठीक आहे. पण अमेरीकन जेवणाची आवड, नवे मॉल्स, अमेरीकन गाण्याची रेलचेल. सारे मला नवे. जणू काही सगळेच अपरिचित. भारताने पुढे जावे, पण दुसरयाचे बघुन नको. आपले काहीच नाही? शेखर कपूर म्हणे भारताचा Spielburg? लिसा रे म्हणजे भारतीय अंजेलिना जोली? ह्यांना भारतीय व्यक्तित्व नाही?
पुण्या-मुंबईची अमेरीका होते आहे. अमेरीकेत योगा जसा अगदी अमेरीकन झाला आहे. त्याप्रमाणे भारतात इतर गोष्टी भारतीय बनून का येत नाहीत? प्रत्येक गोष्ट अनुकरणीय नसते हे अजुन आपण शिकायचे आहे. सध्या जे चालु आहे ती आंधळी कोशिंबीर आहे. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर न्युयॉर्कर मध्ये दोश्यासारखा burrito खाणारे वाढत आहेत, पण त्यांना खरा burrito माहीतच नाही. बहुतेक तो मेक्सीकन आहे हे पण माहीत नसते. ती फक्त क्रेझ आहे. लोकांना या अनुकरणाचे तोटे अजुन माहीत नाहीयेत. हे सगळे परिवर्तन अमेरीकेत पण झाले. पण त्याचे नुकसान २०-३० वर्षांनी दिसते आहे. इथे घराला घरपण नाही. मुले आई-बापाचे तोंड बघायला नको म्हणतात. सुनेला सासुसासरे म्हणजे "devils" वाटतात. (अजून तरी भारतात ते नकोसेच वाटतात, ही पण वेळ येईल). मी माझ्या एका अमेरीकन मैत्रीणीला म्हटले, "मला भारतात जाऊन आजीला भेटायचे आहे", ती वेडीच झाली. तीला स्वतःची आजी कशी दिसते हेच आठवत नव्हते. तीच्या मते तिची आजी म्हणजे एक "Bitch" होती. हे मला मात्र नवीन होते. वयाच्या अठराव्या वर्षानंतर स्वतःचे स्वतः बघा अशा संस्कृतीत वाढलेल्यांना मी अजुनही आई-वडिलांबरोबर राहतो, आणि माझे तीर्थरुप अजुनही माझ्या आजी बरोबर राहतात हे जगातले दहावे आश्चर्य वाटते.
अमेरीकेतील भारतीय आपली मुले मोठी व्हायच्या अगोदर त्यांना भारतात पाठवतात हे किती जणांना माहित आहे? परिस्थितीच अशी आहे इथे. त्यांना भीती वाटते ती या अमेरीकन हवेची, ती एकदा डोक्यात गेली की मुले कामातून जातात असे ते म्हणतात. मुलांचे स्वातंत्र्य आणी काय काय !! इथे "Child Privacy Law" आहे. पालक मुलांच्या सगळ्या गोष्टीत दखल देऊ शकत नाहीत. आपण मात्र या सगळ्याचे आंधळे अनुकरण करतो आहोत.
भारतात असताना मला ही हे पटत नव्हते. सकाळ मध्ये फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे लेख यायचे. मनाला भोक पाडतील असे दाखले असायचे. त्यावेळी नाही पटले पण आज ते दिसतात इथे. ते खरे मानावे लागतात आता. मला मात्र ते भारतात बघवणार नाहीत. अमेरीकेत सगळेच वाईट नाही. इथे पण लोक सुसंस्कृत आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि अजून कमी होत आहे.