माझा विमान प्रवास

आपण मराठी माणसे त्यांना विमान प्रवास म्हणजे काय कौतुक. मी मागील वर्षी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो.पासपोर्ट झाला .

व्हिसा झाला.विमान तिकीट आले. झाली तयारी बॅगा भरल्या. तेवढात एका नातेवाईकाचा फोन आला.अरे तुम्ही वजन चेक केले का ? विमानात जास्तीचे वजन सोडत नाहीत. जास्तीचे वजन फेकून देतात. झाले आले का टेंशन. भेटायला आलेल्या मंडळींनी सुद्धा तोच सूर ओढला. कोण किती कोण किती म्हणते. मग सिंगापूर एअर लाइंस ला फोन केला तर एका तिकीटावर फक्त २० किलोच मान्य होते. मग जास्तीचे सामान काढले. तरी टेंशन कायमच होते. पहिलाच प्रवास त्यामुळे आताच पुढील विचार सुरू झाले. विमनात कसे होईल,तिथे परक्या विमान तळावर कसे होईल, भाषा य्रेत नाही वगैरे वगैरे.

मुंबई विमान तळावरच त्रास सुरू झाला ट्रॉली घेण्यापासून ते पार इमिग्रेशन ते विमानात बसेपर्यंत. झाले या सर्वांतून पार पडल्यावर एकदाचे ४ तास उशीरा विमान निघाले.(उडाले). सिंगापूरला विमान बदलण्याचे होते. जसे सिंगापूर जवळ आले तसे त्या हवाईसुंदरीने सांगितले कि पुढचे विमान गेलेले आहे तेव्हा तुम्हाला पुढच्या विमानात बसवले जाईल. आम्हाला इथे दूसरी एस्‌.टी. पकडण्याची संवय तेव्हा कही कळेनाच. विमानात सगळे वातावरण अगदी गंभीर कोणी कोणाशी बोलत नाही.

सिंगापूरला आल्यावर पुढील विमानाचा बोर्डिंग पास दिला आणि जेवणाचे कूपन दिले ते कुठल्या एअर पोर्ट वरच्या हॉटेलचे होते. ते हॉटेल काही सापडेना कारण पुढील विमानाचे बसण्याचे ठिकाण शोधायचे होते. ते सापडेना फोन करावा तर कोणी सुट्टे पैसे देत नाही आणि त्यांची भाषा येत  नाही. अतिशय घाबरल्यासारखे झाले. कसे तरी दुसर्‍या विमानात येऊन बसलो आणि ऑस्ट्रेलिया विमानतळावर उतरलो. आता इथेही मोठा प्रश्न भाषेचा. पुण्यात कळले होते कि  इथे बॅगा चेक करतात. आता आला का प्रॉब्लेम. इमिग्रेशन झाले. कस्टमला त्या बाईने विचारले आणि विमानात जो डिक्लेरेशनचा फॉर्म दिला होता तो मागीतला आणि बॅगा उघडायला सांगितल्या आणि तपासून लोणची ,चटण्या, वगैरे खाण्याचे पदार्थ सोडत नाही म्हणाल्या मग काय करावे विचारले तर फेकून द्या म्हणल्या.मग काय जड अंतःकरणाने फेकून दिल्या.

आता महत्वाचा प्रश्न माझ्या सारखाच त्रास नवीन परदेशी येणार्‍या लोकांना होत असेल. पासपोर्ट पासून, व्हिसा, विमान तळावरच्या वेगवेगळ्या प्रक्रिया, विमानप्रवास, परदेशात विमानतळावर सामोरेजाणे,पुन्हा परतीचा प्रवास या सर्वांची माहिती असणे जरूरीचे आहे तेव्हा मि एकदा ऑस्ट्रेलिया वारी केली आणि आता अमेरिकेत आलो आहे तेव्हा मला आलेले अनुभव आणि पासपोर्ट काढण्यापासून परदेशात जाऊन पुन्हा भारतात परत येण्यासाठी काय काय करावे कोण कोणती काळ्जी घ्यावी ते लिहीणार आहे आता पुढील वेळी पासपोर्ट बद्धल माहिती करून घेऊ यात

आता इतकेच पुरे आपल्याला काही अडचणी असल्यास जरूर कळवा.   

Unknown

No comments: