एक धार्मिक चिंतन-२

या जगाची जेव्हा उत्पत्ती झाली,त्यानंतर काही वर्षातच प्राणी, वनस्पती जन्माला आले. देवाने प्रत्येक वनस्पती, प्राणी यांना ठराविक आकार, रूप, गंध, ज्ञान, जीवनपद्धती दिली,यामागे काहितरी कारण असले पाहिजे. या पृथ्वीवर सर्वांचा समतोल साधण्यासाठी काही जीवनप्रक्रिया आहेत.  यालाच आपण "अन्नसाखळी" म्हणतो. म्हणजेच उंदरांना सापाने खाल्ले नाही तर जगात उंदीर जास्त होतील आणि माणसांना राहणे कठीण होईल, तसेच सापांना गरुडांचे भय नसेल तर सापांच्या संख्येचा विपरीत परिणाम होईल.

जनावरांमध्ये शाकाहारी, मांसाहारी असे प्रकार असतात, आपण त्यांची संवय बदलू शकत नाही. माणसांची प्रवृत्ती सुद्धा शाकाहारी, मांसाहारी असते.हिंदू धर्मातील कांही देवतांना शाकाहारी, तर काही देवतांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात. म्हणजेच परंपरेने मांस भक्षणाची प्रथा होती.

मांसाहारी हिंदू मांस भक्षण करतात ते शेळी, मेंढी, यासारखे प्राणी, मासे वगैरे...आता असा विचार येतो की, जर जगातील बहुसंख्य माणसांनी मांसाहार केला नसता तर आज या सर्व प्राण्यांची संख्या किती वाढली असती, त्यांना किती अन्न लागले असते. भारताचा विचार केल्यास अन्नाचा पुरवठा झाला असता काय?हा समतोल राखण्यासाठीच तर आपण मांस भक्षण करतो म्हणून तर काही देवतांना मांसाचा नैवेद्य दाखवून मांस खातात. मग आपल्याला काही ठिकाणी असे का सांगितले जाते कि, मांसाहारी नको शाकाहारी व्हा.मांसाहार म्हणजे प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जलचरांचं(मासे,खेकडे वगैरे) मांस पोटात जाणे.

जर आपण सूक्ष्म विचार केल्यास, श्वासोच्छवास करणे प्रत्येकाला जरूरी आहे आणि हवेत सूक्ष्म जंतू असतात, ते पोटात जात नाहीत काय? पाण्याद्वारे जंतू जात नाहीत काय? मग मांसाहार करू नये हा प्रवाद कशासाठी?

प्राण्यांची हत्या करू नये हे ठीक आहे पण त्यांची संख्या मर्यादित ठेवावी हे तर खरे आहे ना?

म्हणूनच हिंदू धर्माची शिकवण, परंपरा योग्य आहे.या सर्व चालीरितींना आधार आहे.  माणसांची प्रकृती आणि प्रकृती, निसर्गाचा समतोल याचा पूर्ण चिचार झालेला आहे,यात नवीन काहीही भर घालण्याची गरज नाही.

हिंदू धर्मातील कोणाही संतांनी, महापुरूषांनी अथवा धर्मगुरूंनी मांस खाऊ नये असे सांगितले नाही कि कोणावर जबरदस्ती केली नाही. फक्त शुद्ध अंतःकरणाने पूजा अर्चा करावी असे सांगितले.

Unknown

No comments: