माझा विमान प्रवास-२

मित्रांनो आजच्या लेखाला आपण विमान प्रवास-२ म्हणू यात.

काल आपण थोडक्यात पाहिले. आज थोडे सविस्तर पाहू यात.

सद्ध्या भारतातून खूपशी मुले नोकरीसाठी अमेरीका,ऑस्ट्रेलियात वगैरे जातात. आणि साहजिकच त्यांना वाटते कि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे यावे. पण त्यासाठी काय काय करावे लागते त्ते मात्र ठाऊक नसते. तर आता आपण तेच जाणून घेऊ यात. आता यात जर कोणाला कांही सुचवायचे असेल तर त्यांनी बिनधास्त सुचवावे.

मागील वर्षी मी मिसेस बरोबर ऑस्ट्रेलियाला मुलीकडे तीन महिने राहून आलो. आणि आता अमेरिकेत मुलाकडे आलो आहे.

परदेशात जायचे म्हणले कि आनंद होतो पण पुढे काय काय अडचणी येतात त्या पाहू यात.(अजिबात घाबरू नये)

भारतातून परदेशात जाऊन पुन्हा भारतात येइपर्यंत येणारे टप्पे

 1. पासपोर्ट-अर्ज भरणे-पोलीस चौकशी-टपालाने पासपोर्ट घरी येणे
 2. व्हिसा- अर्ज कोठे करावा-त्याची फी काय? ती कोठे भरावी? त्या त्या देशाच्या वकिलाती मध्ये मुलाखतीला जावे लागते. तेव्हा तेथे काय आक्षेपार्ह असते. कोणती कागदपत्रे लागतात.ती किती दिवस आधी ध्यावीत. तेथ्रे संभाव्य कोणकोणते प्रश्न विचारतात. त्यावेळेस काय उत्तरे द्यावीत. पुन्हा पासपोर्ट कुरीयरने येतो तेव्हा काय करावे. कधी कधी परत जातो त्यावेळेस काय करावे.
 3. हेल्थ इंश्युरंस(आरोग्य विमा) घ्यावा काय,त्याबद्धल माहिती.
 4. विमान तिकीट-चांगली एअर लाइंस कोणती,तिकीट कमी कसे शोधावे,वगैरे.
 5. परदेशी जाताना प्रत्येक एअर लाइंसचे नियम वेगवेगळे असतात ते कसे पहावेत. त्याची काय काळजी घ्यावी.
 6. किती बॅगा असाव्यात, सामान कसे भरावे,किती भरावे,वजन कसे करावे,हातातल्या बॅगेत काय सामान घ्यावे,लहान लहान गोष्टी अशा पहाव्यात.
 7. विमान तळावर जाण्यासठी किती वेळ आधी निघावे,किती वेळा आधी पोहोचावे.
 8. विमानतळावर-बॅगा चेक करणॆ,बॅगाचे वजन बघणे,त्या कार्गोमध्ये देणॆ,इमिग्रेशन फॉर्म भरणॆ,तो ऑफीसर विचारणारी संभाव्य प्रश्ने,कस्टम क्लिअर करणॆ,बोर्डिंग पास घेणे,विमानात बसतांना पुन्हा चेकिंग,विमानात बसल्यावर काय काळजी घ्यावी,विमानात कोणकोणते फायदे करून घ्यावेत हे माहित नसते,विमान बदलण्याचे असेल तर कोणती काळजी घ्यावी,दुसर्‍या एअर पोर्टवर गेट कसे बदलावे,नवीन विमान बदलताना काय करावे,विमानात डिक्लेरेशन फॉर्म देतात तो कस भरावा.
 9. परदेशातील एअरपोर्टवर- इमिग्रेशन चेक करणे,सामान घेणे,सामान घेऊन कस्टम क्लिअर करणे, इथे जर बॅगा उघडायला लावल्या तर काय करावे,इथे भाषा येत नाही तेव्हा काय करावे,बाहेर कसे पडावे,समजा आपल्या माणसांची चुकामूक झाली तर काय करावे.
 10. परत येतांना वरील सर्व प्रक्रियांमधून जावे लागते,फक्त त्रास होतो तो भारतातून कस्टम मधून जातांना. इथेही आपल्या माणसांची चुकामूक झाल्यास काय करावे.

महत्वाच्या टिप्स

 1. पासपोर्ट सांभाळावा
 2. विमान तिकीट सांभाळावे
 3. सोबतच्या माणसापासून दूर जाऊ नये
 4. सरकारी अधिकार्‍याशिवाय इतरांना पासपोर्ट दाखवू नये
 5. शक्यतो कोणालाही आपला पत्ता देऊ नये
 6. फक्त अधिकृत माणसाकडेच चौकशी करावी,त्यांना अडचण सांगावी
 7. अनोळखी सामानास अजिबात हात लाऊ नये.
 8. शक्यतो इंटरर्नॅशनल रोमिंगचे कार्ड घालून मोबाईल फोन जवळ ठेवावा.
 9. आपली कागदपत्रे कोणालाही दाखवू नयेत.
 10. विमानतळावर अधिकृत टॅक्सी बुक करता येते तेथूनच टॅक्सी ठरवावी.

आज एवढे बस्‌,बाकी उद्या पासपोर्ट कसा काढावा याची माहिती घेउ यात.

Unknown

No comments: