काही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे? रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले? मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का? तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार? इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार? त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.
थोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का ? जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे ?.
थोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.
त्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का ? मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.
अचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का ? मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे ? डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.
आता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.
सकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल ?
पण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.
आता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब? आणि आपण इथे कसे? इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.
मी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.
साहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.
मी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती.
किडनी
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock...
No comments:
Post a Comment