परिक्षाच रद्द करा

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी एक नवीनच फतवा काढला की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घटक चाचणी परिक्षा लेखी स्वरूपात न घेता फक्त तोंडीच घ्यायची, का तर म्हणे मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो. दिवसेदिवस शिक्षण फारच सोपे होत चालले आहे. आम्ही मागे एकदा ब्लॉग मधून लिहीले होते की मुलाची एवढी काळजी असेल तर सर्व इयत्तांच्या परिक्षाच रद्द कराव्यात, म्हणजे मुलांना परिक्षेचा ताण येणार नाही, पर्यायाने पालकांची सुद्धा या प्रकारातून सुटका होईल. सर्वांना फक्त पुढील वर्गात ढकलायचे. अशा प्रकारे दहावीच्या मुलांना किती सोईस्कर होईल. परिक्षा मंडळाचा किती खर्च वाचेल. शिवाय सगळे पास. टक्केवारी प्रमाणे पुढील प्रवेश द्यावेत. कॉपी अजिबात होणार नाहीत. कॉपी कशासाठी होते पास होण्यासाठीच ना! सगळेच पास तर कॉपी कोण करणार.कल्पना करा परिक्षाच रद्द केल्यातर किती पैसा वाचेल. कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचतील. ज्याला गरज आहेत तो अभ्यास करेल. नाही केला तरी बिघडत नाही पास होणारच आहे. अजून एक सुचवावेसे वाटते, मुलांना विषय ऐच्छिक ठेवावेत, भले त्याने एक विषय का घ्यायना, पण त्याने त्या विषयात पास व्हायचे. मग त्याच्या करियरचा त्यानेच विचार करावा. कशाला त्या बिचार्‍यावर विषयांचे ओझे लादायचे. मग सर्व मंडळी खुष.

Unknown

No comments: