आजच्या संगणकाच्या युगात आपण भारतीय आद्य वेद विसरत चाललो आहोत. त्यातीलच एक प्रकार म्हण्जे ’वैदिक गणित’. म्हणजे मोठमोठे भागाकार, गुणाकार, वर्ग, घन, समीकरणे वगैरे चुटकीसरशी कशी सोडवायची. याचे सखोल ज्ञान अथर्ववेदात विखुरलेले आहे. यात एकंदर सोळा सूत्रे आणि उपसूत्रे आहेत, या सुत्रांच्या अधारे कोणत्याही प्रकारचे उदाहरण कमीतकमी वेळात व श्रमात सोडवता येतं. आणि याचे सर्व श्रेय गोवर्धनमठ ( जगन्नाथपुरी ) चे शंकराचार्य ब्रम्हलीन स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांना जातं. यांचा जन्म १८८४ चा. मूळ नाव वेंकटरमण. १८९९साली मद्रास विद्यापीठाने त्यांना ’ सरस्वती ’ ही पदवी बहाल केली.
वैदिक गणितात एकंदर १६ सूत्रे आणि तितकीच उपसूत्रे आहेत. उदा. निखिलम्, उर्ध्वतिर्यग्भ्याम्, आनुरूप्येण, शेषाण्यङ्केन चरमेण, एकाधिकेन पूर्वेण, एकन्योकेन पूर्वेण वगैरे.
विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल भय व तिटकारा असतो, कारण शाळांमधून शिकवली जाणारी पद्धत. आज भारतात अशा गणिताची जरूरी आहे. परदेशात वैदिक गणित शिकविण्यासाठे वेगळा विभाग आहे. आपल्या वेदांमधून उचलून परदेशी विद्यापीठात वैदिक गणित शिकवले जाते आणि आम्ही...!
अजूनही वेळ गेलेली नाही. आता आपण वैदिक गणित शिकले पाहिजे, न पेक्षा याचा भारतात प्रसार झाला पाहिजे. स्वामीजींनी शोधून काढलेल्या वैदिक गणितातील सर्वच पद्धती सोप्या, सुटसुटीत व मनोरंजक आहेत.
आज्च्या युगात गणिताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित लागते. गणिताशिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती अशक्य आहे. समाजामध्ये गणिताविषयी एक प्रकारचे भय दाटले आहे, अगदी अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. म्हणून आज या वैदिक गणिताची अत्यंत आवश्यकता आहे.
1 comment:
खरे तर आम्हिच करंटे निपजलो, म्हणुन या सरकारची इंग्रजी पद्धती चालु ठेवण्याची आणि आपल्या जुन्या गणिताची विटंबना करण्याचे धाडस होतेय. आता तर कुणालाच वैदिक गणित जमत नाही, अन त्यात कोणाला रसहि वाटत नाही.
गणित कठीण जाते म्हणुन त्याला ऑप्शनला टाकायचाहि घाट घातला जातोय. दुर्दैव... दुसरं काय ?
Post a Comment