http://www.esakal.com/esakal/08032008/SpecialnewsFD9693BDC1.htm
आसारामबापूंच्या आश्रमाला सील
भोपाळ, ता. २ - छिंदवाड्यातील आश्रमात गेल्या काही दिवसांत झालेल्या दोन मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आज आसारामबापूंच्या इंदुवती विद्यानिकेतन या आश्रमाला सील ठोकले.
मृत्यू झालेल्या दोन मुलांतील एक पुण्याचा आहे.
या आश्रमात राहणारा वेदांत मानमोडे (वय ५) या मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. वसतिगृहाच्या स्वच्छतागृहातील पाण्याने भरलेल्या बादलीत त्याचे डोके बुडाले होते. हा मुलगा पुण्याचा होता. वेदांतचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे मत त्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तत्पूर्वी, मंगळवारी रामकृष्ण यादव हा मुलगा स्वच्छतागृहाच्या फरशीवर मृतावस्थेत आढळला होता; मात्र त्याच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नव्हते. फरशीवरून घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज छिंदवाड्याचे पोलिस अधीक्षक आर. के. शिवहरे यांनी व्यक्त केला होता. मुलाचा मृत्यू म्हणजे नशिबाचा भाग असल्याचे मान्य करून रामकृष्णची आई मनोरमा आणि वडील मोहनलाल यांनी मुलाच्या मृत्यूचे दुःख स्वीकारले होते.
मात्र, आश्रमात दोन मुलांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाल्यामुळे लोकक्षोभ निर्माण झाला व तो शमविण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने आज आश्रमाला सील ठोकले. आश्रमाच्या शाळेतील एक शिक्षक मनोहर जयस्वाल आणि वसतिगृहाचे वॉर्डन ओमप्रकाश प्रजापती यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाच जागी दोन मृतदेह आढळल्याने या प्रकरणी संशय निर्माण झाल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. के. राऊत यांनी नमूद केले. या मुलांच्या पार्थिवांच्या आणखी तपासणीसाठी भोपाळहून विशेष तज्ज्ञांचे पथकही येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अहमदाबादमध्ये असलेल्या "गुरुकुल' या आसारामबापूंच्या आश्रमात दीपेश आणि अभिषेक वाघेला या चुलतभावांचा नुकताच मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाने जोरदार निदर्शने केली होती. लाठीमार करून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली होती. त्या पाठोपाठ छिंदवाड्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
बापू, काय हे! रोज रोज तुमचे दूरदर्शन वरील प्रवचन ऐकून आमव्या जीवनमानात फार फरक पडला हो, शिवाय तुमच्या प्रवचनाच्या c.d.चे आम्ही तर पारायण केले. तुमच्या फोटोंचे लॉकेट आम्ही कित्येकांना भेट दिले, पण तुमच्याच आश्रमात हे घडावे. सांगा आम्ही आता लोकांना काय सांगणार. आम्ही दिलेले लॉकेट परत येऊ लागले. आपल्या औषध दुकानातून घेतलेले आणि रोज घेत असलेले चूर्ण आता कडू लागायला लागले हो! झाले तर झाले पण तुमच्या अमोघ वाणीतून काहीच प्रसवत नाहीये. बोला काहीतरी बोला, आम्हालाही कळू द्यात, नक्की काय झाले आहे ते. महात्मा गांधींच्या पवित्र भूमीतील आपण, ज्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र सांगितला, त्या तुमच्या आश्रमातच अशी घटना घडावी, काय वाटले असेल त्या महात्म्याच्या आत्म्याला. आधीच त्यांनी लोकसभेतील नोटांची पुडकी पाहून, स्वर्गात देवाला सांगितले असेल, बाबारे स्वातंत्र्यासाठी लढून माझी चूक झाली, पुन्हा मला भारतात जन्म नको. ज्या नोटांवर माझे चित्र छापले आहे, त्याच्याच साक्षीने व्यवहार करतात, आणि मला निमूटपणे पहावे लागते. त्या माझ्या जन्मभूमीत हे नवीन काय? बापू या नावाबद्दल लोक काय काय गैरसमज करून घेतील.
आसारामजी आपल्या नावापुढेही आपण बापू नाव लावलेत, त्याचा तरी मान राखून काहीतरी बोला. परवा गुरूपौर्णिमा झाली, आपण पुण्यात किती छान कार्यक्रम केलात, हाच आपला संदेश समजायचा काय? आपल्याकडून जाहीरपणे वरील प्रकारावर प्रवचन अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment