अभिनव बिंद्रा अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आम्हांला तू सुवर्णपदकांच्या यादीत नेऊन बसवलंस, तुझे किती अभार मानावेत. खरे तर नेमबाजी ही आपली रामायण महाभारतापासूनची परंपरा, पण काही जणांनी क्रिकेटला नावारूपाला आणले, आणि घरच्या खेळाला मागे टाकले. बाहेरच्या मुलाला पदरात घेतले आणि घरच्याला उकिरड्यावर टाकले. बाबा, आता तुझ्यामुळे तरी या क्रिकेटच्या कॅन्सरमधून आम्ही बरे होऊ.
जास्त काय लिहीणार, आजच्या "सकाळ" मधील चिंटू सार्या भारताचे प्रतिनीधीत्व करतो आहे. होऊ दे मुलांचा असा गोड गोंधळ.
जास्त लिहीत नाही, कारण नजरेपुढे फक्त सुवर्ण पदकच दिसते आहे, त्यामुळे काही सुचत नाहिये.
No comments:
Post a Comment