http://www.esakal.com/esakal/08182008/SpecialnewsD07255B4F3.htm
ही तर ध्येयपूर्तीची सुरवात - मायकेल फेल्प्स
बीजिंग - ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्णपदके मिळविण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न मायकेल फेल्प्सने आपल्या दुसऱ्याच स्पर्धेत बीजिंगमध्ये सत्यात उतरवले. पण एवढ्यावर तो समाधानी नाही.
तो म्हणाला, ""आयुष्यात बाळगलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्याची ही तर सुरवात आहे. मला अजून खूप काही मिळवायचे आहे.''
स्पिट्झच्या सात सुवर्णपदकांचा विक्रम मोडल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत फेल्प्स आपल्या कारकिर्दीविषयी, उद्दिष्टांविषयी भरभरून बोलला. त्याच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येत होती.
http://www.esakal.com/esakal/08182008/TajyabatmyaSportsPune03EB088032.htm
भारतीय फलंदाजांचा "खेळखंडोबा'
डम्बुल्ला - श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात फलंदाजांच्या गचाळ कामगिरीमुळे भारत अडचणीत आला आहे.
या दोन बातम्यांपैकी दुसरी बातमी वाचली की, संताप येतो, आणि कीवही करावीशी वाटते. एक जो आठ सुवर्णपदके मिळवतो, तरीही विनयाने म्हणतो, मला अजून खूप करावयाचे आहे. या क्रिकेटपटूंना आपणच डोक्यावर घेतले आहे, आणि ते बेशरमपणे हारतात. World Cup ला काय झाले, दुसरा कसा हारतो, यावर आपण डोळा लावून बसलो होतो.
हे जे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू आहेत, यांना कायमचे घरी बसवा आणि तो पैसा पुढील चार वर्षांनी येणार्या ऑलिंपिक मध्ये खेळाडू तयार करण्यासाठी वापरा. बास या क्रिकेटपटूंचे लाड. कोणीही भरंवशाचे नाहीत. बरेचसे खेळाडू म्हातारे झालेत, ते म्हातार्या घोड्याप्रमाणे रेस जिंकू शकणार नाहीत.
असं कुठलं कारण आहे की, भारतात जन्म घेतल्याचा अभिमान वाटावा.
No comments:
Post a Comment