पुन्हा देव

जगात देव आहे की नाही? आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आयुष्य खर्ची पाडलीत मग आता आपण नव्याने त्या विषयात बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग हा विषय आता का? तर आमचे असे मत, नाही खात्री आहे की, आता जगात जो हिंसाचार चालला आहे, त्यामागे देवाबद्दल श्रद्धाच असावी. बघा, प्राचीन इतिहास बघा, माणसात जाती संस्था, धर्म होता काय? नाही मग असे काय घडले की, धर्म निर्माण झाले. धर्म प्रथम कोणी निर्माण केला, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली, आणि त्याला धर्माची काय जरूरी भासू लागली. हिंदू कसे निर्माण झाले, यांनी हे आपले देव आहेत हे कशाच्या आधारावर मानले? नंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या धर्मसंस्थापकाला अशी काय जरूरी भासली की, नवा धर्म स्थापन करावा त्यांच्यासाठी वेगळी नियमावली म्हणजेच धर्मग्रंथ प्रमाण ठेवावा. मुस्लिमांनी तरी विशीष्ट धर्म का पाळावा. काय झाले यामुळे लोक धर्मांध होऊ लागले, धर्म प्रसार करून आपल्या देवांच्या संकल्पना दुसर्‍याच्या माथी मारू लागले. जर जगात प्रथम धर्माची गरज निर्माण नसती झाली तर आज ही परिस्थिती आली असती का?

देव कोणी पाहिलाय का? नाही, मग हे पुतळे, मुर्त्या, चित्रे काय आहेत तर ते असतील, फक्त कल्पनाशक्तीव्या भरार्‍या. नाहीतर एकेका देवा्चे अनेक प्रकारचे फोटो का मिळाले असते. वेगवेगळ्या मुर्त्या का पूजील्या असत्या.प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे देव शोधत असतो. इतर देवांबरोबर आपल्या देवाची तुलना करत असतो. मग श्रेष्ठत्वा बद्दल वाद निर्माण होतात. आदिमानवाला देव माहीत नव्हता पण तो या पंचमहाभूतांमध्येच देव शोधत होता. पंचमहाभूते कोणातही कसलाही फरक नाहीत. कोणत्याही देशातला माणूस असो हवा त्याला प्राणवायू देणारच, तो जे पेरेल तेच उगवणार. साखर सर्वांना गोडच लागणार, भले नाव वेगळे असू देत. म्हणून पंचमहाभूतेच सत्य आहेत.

आज जगातील सर्व लोकांची  भाषा एकच असती तर. कोणीही मोठेपणा साठी नवा धर्म, नवा पंथ न स्थापता याच धर्मातून कार्य केले असते तर? तत्वज्ञान सांगण्यासाठी वेगळ्या भाषेच्या कुबड्या कशासाठी? वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, धर्मग्रंथच आज या सर्व दहशतवादाला कारणीभूत आहेत. सर्व एकाच धर्माचे असते तर धर्मांधता असती काय? धर्मात अतंर्गत कलह झाला असता काय? कधी कधी वाटते हे धर्मसंस्थापकच निर्माण झाले नसते तर?

Unknown

No comments: