सकारात्मक विचार

आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे. हे मनच आत्म्याचे एक रुप आहे. आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. अक्षरश: ईश्वराला समोर उभे करु शकते. म्हणजेच मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात. अक्षरश: बाभळीला गुलाब दिसू लागतात. सुगंधी वातावरण  जाणवते. आता ह्या सृष्टीतल्या सकारात्मक, उर्जा जर आपण मनाद्वारे ग्रहण केल्या तर जीवन सकारात्मक ( positive) च असेल. मग म्हणा,“ माझा शुध्द आत्मा सृष्टीतलील सर्व शुध्द आणि पवित्र उर्जा ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि त्या मी ग्रहण करीत आहे.”
असे दिवसातून ५ ते १० वेळा आकाशाकडे तोंड करुन, मोठ्याने, हात वर करुन म्हणा बघा काही दिवसातच काय फरक जाणवू लागतो.
सकरात्मक विचारात प्रचंड शक्ती दडलेली आहे. अगदी इंजिनमधल्या वाफेच्या दाबाइतकी, अणुबाँबमधल्या शक्ती इतकी. सकारात्मक विचाराने मानसिक त्रास होत नाही. विचारच करायचा ना?. तर मग सकारात्मक करुयात ना?
एखाद्याचे ह्रदयाचे ऑपरेशन आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी नेले जात आहे. जर त्याने विचार केला कि, माझे ऑपरेशन ठीक पार पडून मी लवकरच बरा होइन. तर मग इथेच विचार थांबतात. पण त्याने नकारात्मक विचार केला तर काय होईल? मग मला भूल नीट दिली जाईल काय? डॉक्टर निष्णात असतील का? ऑपरेशन जर यशस्वी झाले नाही तर? काय होईल? मग माझ्या बायका मुलांचे काय होईल? वगैरे वगैरे. या विचारांना अंतच नाही. शिवाय सर्व लोकांवर संशय येऊ लागतो. मला नीट बघतील का? डाँक्टर नीट आँपरेशन करतील ना? वगैरे वगैरे. आता बघा, असा विचार करुन काही उपयोग आहे का? आपण डॉक्टर मंडळी बदलू शकतो का? ऑपरेशन टाळणे आपल्या हातात आहे का? मग नकारात्मक विचार करुन आपले मानसिक खच्चीकरण कशासाठी?
दुसरे उदाहरण सांगतो. मला कोणाचे मोबाइलवर मिसकॉल आले तर मी खूपच चिडायचो. खूपच चिडचिड व्हायची हे लोक कशासाठी फोन घेतात वगैरे. मग मी काय करु लागलो. कुणाचा मिसकॉल आला ना?, त्याला परत उलट मिसकॉल देऊ लागलो. विचार करु लागलो अरे कदाचित त्याला मिसकॉल देऊन हे पहायचे असेल की आपल्याला वेळ आहे की नाही? मग मी उलट मिसकॉल देऊन गप्प राहू लागलो तर मग माझी चिडचिड कमी झाली. कारण मी त्याला सांगू लागलो, कि बाबारे मला वेळ आहे तू फोन कर. त्या दिवसापासून मी शांत राहू लागलो.
जी गोष्ट आपण टाळू शकत नाही, बदलू शकत नाही, पण त्यावर विचार करु शकतो तर मग सकारात्मक विचार का नको?
खाली काही प्रश्न मी देतो बघा त्यांची नकारात्मक उत्तरे तयार करुन. खूप त्रास होईल.
१) परिक्षेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना विचारा- बाबारे नीट अभ्यास केलास ना?. नाहीतर नापास झालास तर काय करणार?.
२) रुग्णाला विचारा- औषधे वेळेवर घेत जा बरे का? औषधे नाही घेतली तर आजार बळावतो आणि मग त्यातच त्याचा अंत होतो.
३) प्रवासाला निघालेल्या माणसाला विचारा- अरे लवकर जा, नाहीतर गाडी चुकली तर काय करशील?.
४) कोर्टात निकालाच्या वेळेआधी विचारा- आपल्या बाजूने निकाल लागला तर उत्तम नाहीतर विरुध्द गेला तर काय करायचे?.
म्हणून म्हणतो , नेहमी सकारात्मक चिंतन करा. बघा निर्णय चांगलेच मिळतात.
१) कामाला बाहेर जाताना- मी ह्या कामाला जात आहे ते काम होणारच तो माणूस मला भेटणारच. आणि माझे काम होणार?.
२) परिक्षेला जाताना- मी अभ्यास चांगला केला आहे, मग मला पेपर सोपा जाणारच, मला चांगले मार्क मिळणार.
३) कोणाकडची उधारी वसूल करताना- मी पैसे देताना शुध्द मनाने दिलेत तरी तो मला पैसे परत देईन.
४) डाँक्टरकडे जाताना- मला बरे वाटत नाही पण मी मनाची खात्री करतो की मला बरे वाटेल आणि मी ठणठणीत बरा होईन. प्रत्येक वेळेस असे सकारात्मक विचार करा आणि परिणाम पहा.
शेवटी अजून एक मंत्र देतो.
“ रात्री झोपताना, दोन्ही हात जोडून म्हणा-
“ माझ्या शुध्द आत्म्याने, मी जगातील सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. माझे हातून दिवसभरात काही अपराध झाल्यास, कोणी आत्मा दुखावला गेल्यास, त्यांनी माझ्या आत्म्याला क्षमा करावी ”.

Unknown

No comments: