शिमगा

आला ’शिमगा’ आला. नुसती बोंबाबोंब. पण या सणालाच काय मारायची बोंब. अरे बाबा एथे तर रोजच बोंबाबोंब आहे, त्यामुळे खास शिमग्यासाठी बोंब मारण्यासाठी कुठे अंगात त्राण आहे.

साखरेचे भव वाढले, अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत संसार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे, संसारात बोंबाबोंब. वीज वितरण कार्याल्यात गोंधळ, त्यांचे काम फक्त वीज दरवाढ करण्याचे, वीजेचे दर हाताबाहेर गेलेत, पण काय करणार त्यांची मोनोपॉली आहे, बाजारात दुसरीकडे वीज मिळत नाही, आहे ना बोंबबोंब. आर.टी.ओ. कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांच्या शिवाय लायसेंस मिळतच नाही, अगदी कोणताही वशिला लावा. दररोज नवीनवी बोंब कानावर येते, वर्तमानपत्रात छापून येते, राजकारण्यांबद्दलची. त्यांनी तर भारताची होळीच केली आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाची  होळी करून, त्यांच्या पोळ्या चांगल्या भाजल्या जाताहेत.  शिक्षणात तर एवढ्या मोठा प्रमाणावर बोंबाबोंब आहे की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आर्त वेदना कोणालाच ऐकू जात नाहीत. जे  आता जिवंत आहेत त्यांया भवितव्याचे काय, ती पण मूक बोंबाबोंबच ना? सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय?......च. ना!

या सर्वांवरची सर्वात मोठी होळी अतिरेकी करतायत, आपण होळीत लाकडे, गोवर्‍‍या जाळतो, हे अतिरेकी जिवंत माणचेच जाळतायत, आणि सापडतच सुद्धा  नाहीत, सापडले तरी भारत सरकारकडे न्यायालयात सुरक्षित असतात. त्यांना माहिती आहे, आपाण कितीही मोठी होळी केली तरी, आपल्या नावाची बोंबाबोंब होत नाही.

आम्ही भारतीय रोजच होळी, शिमगा अनुभवतो आहोत, पण आता बोंब मारण्यासाठी फुरसतच नाही, अंगात त्राण नाही. रंगपंचमीचे रांग उधळायला मनात उमेद नाही , आम्ही रंगांधळे झालोत, अतिरेक्यांनी आम्हांला रक्ताचा लाल रंगच दाखवलाय, पण सरकार त्यांना आपला रंग दाखवत नाही.

Unknown

No comments: