नगर, २ ऑक्टोबर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आज सायंकाळी राळेगण येथे झालेल्या या ग्रामसभेला हजारे यांच्यासह करप्शन अगेन्स्ट इंडियाचे अरविंद केजरीवाल, उद्योगपती अभय फिरोदिया, त्यांच्या पत्नी इंदिरा फिरोदिया आदी उपस्थित होते. या सभेत राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी हजारे यांना गावाच्या वतीने ‘महात्मा’ उपाधीने गौरविण्याचा ठराव मांडला. हा ठराव मांडताना त्यांनी हजारे यांच्या ग्रामविकास व भ्रष्टाचार विरोधी कार्याचा आढावा घेतला. हजारे यांना विविध संस्थांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार व सन्मान दिले, मात्र गावाने त्यांना अद्यापी काहीही दिलेले नाही. सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांना ‘महात्मा’ पदवी देण्यात यावी असे मापारी यांनी सांगितले. टाळ्या व घोषणांच्या गजरात हा ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केल
अण्णा हजारे यांची माफी मागून, खरोखरच अण्णा महात्मा गांधींइतके थोर आहेत काय?
No comments:
Post a Comment