भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायला सर्वात जास्त कष्ट घेतले ते महात्मा गांधींनी. पण आज त्यांची आठवण कोणाला आहे? परवाच २ ऑक्टोबर गांधी जयंती होती पण भारतात त्याची आठवण कोणाला होती काय? सर्व टी.व्ही. चॅनेलवाले नको नको त्या बातम्या दाखवतात, पण त्यांना गांधींबद्दल १० मिनीटे सुद्धा वेळ नव्हता. रविवारी गांधी जयंती आली, आणि एक दिवसाची सुट्टी बुडाली म्हणून कित्येक नोकरदार हळहळले असतील. फक्त आठवण असेल ती दारू पिणार्यांना कारण त्या दिवशी भारतात दारू मिळत नाही ना?
कोणत्याही वर्तमानपत्रातून लोकांना आठवण केली गेली नाही?
जर महात्मा गांधी नसते तर? किंवा त्यांनी या भानगडीत न पडता वकिली करून पैसा मिळवायचा विचार केला असता तर?
खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे !
No comments:
Post a Comment