भारतात हवामान खाते जेव्हा अंदाज व्यक्त करते तेव्हा लोक त्याची चेष्टा करतात. जसे जेव्हा खाते पावसाचा अंदाज सांगते तेव्हा हमखास पाऊस पडणार नाही याची खात्री असते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवामान खाते सांगते, यापुढे तीन चार दिवस पाऊस पडणार, पण जर पाऊस पडला नाही तर लगेच सूर्यप्रकाशाचा अंदाज होणार. अगदी ठरवून अंदाज चुकतात. पण एक बरे कधितरी अंदाज बरोबर येतात. आणि हवामान खात्याची लाज राखली जाते.
पण आता मी इथे अमेरिकेत आहे, या ठिकाणी हवामान खात्याची वेब साईट आहे, त्यावर अगदी तासातासाचाही अंदाज असतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी अगदी त्याप्रमाणेच हवामानात बदल होतो.
असे वाटते, निसर्गच या हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे बदलतो. त्याला स्वतःचे असे मत नाहीच.
No comments:
Post a Comment