http://www.esakal.com/esakal/20111019/4629862082212766565.htm
टीम अण्णा"त फूट
(सकाळ न्यूज नेटवर्क)
Wednesday, October 19, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: snn, team anna, anna hazare, lokpal bill
नवी दिल्ली - भ्रष्टाचाराला विरोध आणि जनलोकपाल विधेयक या मुद्यांवर एकत्र आलेल्या "टीम अण्णा'मध्ये फूट पडली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "कोअरग्रुप'मधील पी. व्ही. राजगोपाल आणि राजेंद्र सिंह यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने राजकीय वळण घेतल्यामुळे आपण बाहेर पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिस्सारमध्ये कॉंग्रेसविरोधात प्रचार करण्याचा निर्णय हा संपूर्ण "कोअर ग्रुप'चा नव्हता, असाही दावा राजगोपाल आणि राजेंद्रसिंग यांनी केला आहे.
अण्णा आपण खरे तर चांगले काम करत होतात, पण कुठे माशी शिंकली आपल्यात फूट पडली. ते होणार होतेच. कारण अण्णा आपण आपल्या आंदोलनात राजकारण आणलेत. कॉंग्रेसविरोधी प्रचार केलात, म्हणजे बाकी सर्व पक्ष धुतल्या तांदळासारखे काय? अण्णा आपण अफजल गुरू, कसाब बद्दल काहीच बोलत नाही आहात. का? कितीतरी शिक्षणा संस्थेतील घोटाळे आपण का पहात नाही? किती किती सांगायचे अण्णा. आता देवाची मर्जी.
No comments:
Post a Comment