अण्णांचा कॉंग्रेस विरोधी प्रचार अयोग्य - हेगडे
वृत्तसंस्था
Monday, October 10, 2011 AT 04:20 PM (IST)
Tags: congress, satosh hegade, anna hazare
बंगरूळ - हरियानातील हिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायाधीश संतोष हेगडे यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.
यासंदर्भात हेगडे म्हणाले,""प्रत्येक राजकीय पक्षात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असतात. एखाद्या पक्षात काही वाईट प्रवृत्ती असल्या तर याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पक्ष एकाच विचाराचा आहे. त्यामुळे कॉंगेसला विरोध करणे योग्य नाही. अशा प्रचाराला माझा विरोध आहे. मात्र भ्रष्ट व्यक्ती किंवा भ्रष्ट समूहाविरोधात प्रचार करण्यास माझा पाठिंबा राहील. टीम अण्णांनी कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता वाईट प्रवृत्तीच्या उमेदवारांना विरोध करावा.''
हिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणार असल्याचे टीम अण्णांनी जाहीर केले आहे.
अण्णा आपण जे कार्य करता ते योग्यच आहे पण एखादा पक्षच योग्य नाही असे समजून त्या विरूद्ध प्रचार करणे योग्य नाही. कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी नाही तर त्यातील मंडळी ब्रष्टाचारी आहेत. त्या व्यक्तिंविरूद्ध प्रचार करावा. पक्ष श्रेष्ठ असतो, हे आपणास काय सांगावे.
No comments:
Post a Comment