कायदा

समाजात लोक कोर्टाची पायरी का चढतात, त्यांना काय हौस असते काय? पण नाही जे कायदे आपण बनवलेत तेच राबविण्यासाठी न्यायालये उघडली, कायद्याचे शिक्षण घेऊन वकील तयार झाले, लोकांना कायद्याचा अर्थ समजावून देण्यासाठी. जेव्हा न्यायाधीश न्याय सुनावतात, तेव्हा ते जगातील परिस्थितीचा विचार करत माहीत, कारण त्या चार भिंतींपलिकडेही समाजाचे जग असते, पण न्यायाधीश मात्र समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायदान करतात. हे किती योग्य आहे. कायदा राबविणारे कितीही चतुर असले तरी, सामाजिक सभ्यता ही समाजाच्या वळणावरच अवलंबून असते ना? नुसता कायदा राबवून शांतता प्रस्थापित होत नसते, कारणा कायदा समाज, समाजातील माणसे जन्माला घालत नसतो. मासांचे आचार विचार बदलू शकत नाही, उलट अशी कित्येक उदाहरणे आहेत की, थोड्याशा शिक्षेने मोठमोठे गुन्हेगार तयार झालेत. लक्षात घ्या कायदा राबविण्यासाठी प्रत्येक वेळॆस पोलीसांची फौज उभी राहू शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. नाहीतर माय नेम आणि जर्मन बेकरी असा प्रकार घडतो.

काश्मीरमध्ये दर दोन तीन माणसांमागे एक पोलीस किंवा जवान आहे, मग तिथे तर कायदा चांगलाच राबवला गेला पाहिजे, मग मागील दोन दशकांमध्ये तिथे शांतता का प्रस्थापित झाली नाही? आसाममध्ये बोडो किंवा उल्फा दहशतवाद्यांना आळा बसला काय? त्यामानाने महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे.  

कायद्याचे राज्य होण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आज वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

Unknown

1 comment:

हेरंब said...

लेख योग्य आहे पण शेवटचं वाक्य चांगलंच खटकलं. मला नाही वाटत कायद्याचे राज्य येण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत.. वेळ मिळाला तर माझा आजचा लेख वाचून बघा.

http://harkatnay.blogspot.com/2010/02/blog-post_16.html