दहशतवाद म्हणजे काय तर जबरदस्तीने, जी आपली वस्तु नाही ती धमकावून हेसकावून घेणे. दहशतवादाला जात पात धर्म कशाकशाची म्हणून चाड नसते. अतिरेकी हल्ल करतात, काहीतरी मागणी करतात, अपहरण करतात तेव्हाही मागणी करतात. मग आपलेच लोक जेव्हा आपल्यावर अत्त्याचार करतात, तो दहशतवाद नाही का? फक्त नाव वेगळे, शेवटी परिणाम तोच ना? फक्त त्रास देण्याचा प्रकार वेगळा. जेव्हा सामूहीक हत्याकांड होते, सामूहीक बलात्कार केला जातो, तोही एक दहशतवादाचाच प्रकार का म्हणू नये? भारतात सामान्य माणसावर जे अत्याचार होतात, त्याची जी लूट चालली आहे, ते मरण तर आम्ही सामान्य रोजच भोगतो आहोत.
पेट्रोलचे भाव वाढले तर, रिक्षावाले, बसवाले भाडे वाढवतात, महागाई वाढते, पण आता भाव एकदम १० रूपयांनी मागील दोन महिन्यात कमी झाले,पण कोणीही भाडेवाढ कमी करत नाही, याला काय नाव द्यावे? हे तर रोजचेच मरण आहे ना?
आज बातमी आहे, पुणे माहानगरपालिकेत टेंडरसेलमध्ये गुंडगिरी झाली, दहशत माजवण्यात आली, एकाने तर म्हणे धमकावण्यासाठी रिव्हाल्वर काढले होते, हा दहशतवाद नाही काय?
सामान्य माणसाची, नियम धाब्यावर बसवू्न, राजरोस लूट चालली आहे. कोर्टात वकील मंडळी, त्यांना तर दरपत्रकच नाही, हॉस्पीटल मध्ये डॉक्टर मंडळी, रस्यावर रिक्षा बसवाले, शाळा कॉलेजत शिक्षणसम्राट या सर्व ठिकाणी लोकांना आर्थिकदृष्ट्या नागवे केले जात नाही काय? थोड्याफार फरकाने हा दहशतवादच होतो. या सर्व क्षेत्रात सर्वच मंडळी तशी नाहीत. खूपशे प्रामाणिकही आहेत. पण परिणाम होतातच ना?
शेतकर्यांच्या आत्महत्या कोणत्या प्रकारात मोडतात, कोणी समजावून सांगेल काय?
शेवटी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद वाईटच, तो मोडून काढलाच पाहोजे.
No comments:
Post a Comment