भारतात निवडणुका जवळ आल्या की, पक्षा पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू होतात. दुसरा पक्ष कसा वाईट, कसा फसवतो हे गळा काढून सांगितले जाते, पण आपल्या पक्षाने मागील पाच वर्षात काय दिवे लावले, याकडे मात्र काणाडोळा केला जातो. भाजपने पुन्हा एकदा रामनामाचा जप चालवला आहे, आता जनता त्यांना फसणार नाही. नरेंद्र मोदी म्हणतात, कॉंग्रेसच्या घराणेशाही पासून सावध रहा. आता घराणे शाहीचा विचार केल्यास सगळ्यांनीच वारसांना भारत सोपवला आहे. सर्वजण आपल्या नातेवाईकांना राजकीय वारस बनवत आहे. शिवसेनेत काय झाले, पुत्रप्रेमापोटी काही अप्रिय निर्णय घेतले गेले, आणि आज मनसेचा उदय त्यातूनच झाला ना?
घराणेशाही कशी रूजत गेली पहा -
पं..जवाहरलाल नेहरू - इंदिरा गांधी - राजीव गांधी - सोनिया गांधी - राहुल गांधी. शरद पवार - अजित पवार - सुप्रिया सुळे. सुनील दत्त - प्रिया दत्त. वसंतदादा पाटील - नातू प्रतीक पाटील. बाळासाहेब ठाकरे - उद्धव ठाकरे. विलासराव देशमुख - अमित देशमुख. पतंगराव कदम - विश्वजीत कदम. मुरली देवरा - मिलींद देवरा. छगन भुजबळा - पंकज भुजबळ. नारायण राणे - निलेश राणे. प्रमोद महाजन - भार्या पूनम महाजन. गोपीनाथ मुंडे - कन्या पंकजा मुंडे. गणेश नाईक - संजीव नाईक.
ही काही उदाहरणे. स्थानिक पातळीवरची यादी अजून कितीतरी मोठी होईल. या सर्वांची भविष्यातील राजकीय कारकीर्द उज्ज्वल होवो, ही सदिच्छा.
भारतात असा कायदा आहे का? की वारसांनी लोकप्रतिनिधी होऊ नये. सर्वात जास्त मक्तेदारी गाजवली ते नेहरू-गांधी घराण्याने. आताशी चित्रपटसृष्टीतही नट नट्यांची मुले मुली हक्काने तुटका फुटका अभिनय(?) करतातच ना? राजकारण तरी काय?, अभिनयाला तर इथे महत्व आहे. चित्रपटात तरी कॅमेर्यासमोर अभिनय करावा लागतो, त्याला टेक रिटेक असतो, पण राजकारणात Live अभिनय करावा लागतो, याला जास्त चातुर्य लागते.
मतदार राजा, आज तू जरी मतदान न करता वैतागून घरी बसलास तरी, कोणी तरी निवडून येणार आहे आणि तुझ्या माथी पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे. आज पाया पडणारे उद्या पायाखाली चिरडणार आहेत.
महाभारतात श्रीकृष्णाने म्हणल्याप्रमाणे, " यदा यदा ही धर्मस्य", आपण सर्वजण उद्धारकर्त्याची वाट पाहू यात.
No comments:
Post a Comment