हे आहेत श्री. सोमनाथ चटर्जींचे संतप्त उद्गार -
http://beta.esakal.com/2009/02/19214512/somnath-chatarjee-angry-with-m.html
नवी दिल्ली - सभागृहाचे कामकाज सुरू होताना लोकसभा सदस्यांचा गोंधळ आणि त्यांना आवरण्यासाठी शाब्दिक छडी उगारून तयार असलेले "हेडमास्तर' सोमनाथदा हे चित्र नेहमीच दिसणारे. परंतु, आज एकाचवेळी भाजप, बसप, तेलगू देसम, तमिळनाडूतील खासदार असा सर्वपक्षीय गोंधळ झाला. वारंवार सांगूनही खासदारांनी कामकाज रोखून धरले होते. या लाजिरवाण्या प्रकारामुळे सोमनाथदांची उद्विग्नता टोकाला पोहोचल्याने अखेर, "तुम्ही निवडूनच यायला नकोत. तुम्ही जनतेचा विश्वासघात करीत असल्याने जनताच तुम्हाला धडा शिकवेल', असे कडक शब्दांत फटकारीत त्यांना कामकाज तहकूब करावे लागले.
जेव्हा संसद कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, शी, सोमनाथ चटर्जी, संतापतात तेव्हा, कल्पना करवत नाही की, खासदारांनी संसदेत किती भयंकर गोंधळ घातला असेल ते. हे खासदारांनो, आम्ही भारतीय जनता तुम्हाला कशाला निवडून देतो, संसदेत गोंधळ घालायला? अरे, तुम्ही आमचे प्रश्न सोडवावेत. भारताअच्या सुरक्षेची काळजी करा. मंदीची लाट आलेली आहे, त्यावर तोडगा काढा. गरीबी कशी हटवता येईल त्यांवर चर्चा करा. तुम्हाला परत निवडून देणे म्हणजे मुर्खपणाच ठरेल. पण नवीन जे येतील त्यांची काय कथा. ते सुद्धा असेच वागणार.
भारतीय राज्यघटनेत एक दुरूस्ती जरूरी आहे, जनतेला आता हक्क पाहिजे की बहुमताने त्या लोकप्रतिनीधीचे पद धोक्यात तेच मतदार आणू शकतील. किंवा त्यांनी काहीही गैरवर्तन केले की त्यांची उचलबांगडी झाली पाहिजे. कारण लोकप्रतिनीधींना आता, एकदा निवडून आल्यावर ह्टविण्याचा कायदा नाहिये. म्हणून त्यांना निवडून आल्यावर मस्ती येते.
ही बातमी पूर्ण वाचा.
No comments:
Post a Comment