शनिवारवाड्याबाहेर छबिन्याकरितां प्रातःकाळपासून सायंकाळपर्यंत स्वार असत. त्यांपैकी ५३ दिल्ली दरवाजापुढे व १० गणेश दरवाजापुढें. खुद्द वाड्यांत २२० पायउतार लोक असत. त्यांपैकी १०५ इसमांना प्रातःकाळपासून दोन प्रहरपर्यंत रहावे लागे. त्यांची वाटणी अशी - २१ चाफेखणांत व ८४ सार्या दिवाणखाण्यांत मिळून. दोन प्रहरांपुढे पहिले इसमास सुट्टी होऊन नवे ११५ इसम येत; व रात्रीच्या वेळीं आंतल्या व बाहेरच्या लोकांची एकूण संख्या २३९ असे. त्यांतील १२५ वाड्याबाहेरचे स्वार व ११५ वाड्यामधील पायउतार. अशा रितीनें रात्रंदिवस तीन पाळ्या धरतां ५२२ इसम कामावर येत. यावरून वाड्याचा विस्तार, त्यांतील विभाग यांचा अंदाज अधिक स्पष्ट रितीनें बांधता येतो.
हे वर्णन पुण्यांतील शनिवारवाड्यातील पहार्याचे आहे.
संदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक – वासुदेव कृष्ण भावे, सन १९३५
हे वर्णन पुण्यांतील शनिवारवाड्यातील पहार्याचे आहे.
संदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक – वासुदेव कृष्ण भावे, सन १९३५
No comments:
Post a Comment