आजच सर्व वृत्तपत्रांमध्ये, दूरदर्शनवर एक बातमी पहायला मिळाली, आणि खरोखर असे वाटू लागले कि, भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी सरकार किती काळजी घेते. भारतातील मुलांत स्वाभिमान नाही, म्हणून प्रसिद्ध अभिनेता "अमिताभ बच्चन" यांच्या दिवार चित्रपटावर आधारीत धडा N.C.E.R.T. च्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या सोबत त्या चित्रपटातील दृश्यही आहे.
सरकारने हे बरोबर ओळखले आहे कि, कोण्ताही विषय चित्रपट माध्यमातून शिकवल्यास मुलांना लवकर समजतो. यात सरकारने किती पक्षी मारलेत पहा. धडा समजला नाही तर C.D. आणली तर घरी बसून अभ्यास करता येईल, क्लास लावायला नको. आई वडील सुद्धा समजाउन घेतील. C.D. विकणार्यांचा धंदा होईल. एवढा स्वाभिमान जागृत होईल कि,मुले काहिही फेकलेले उचलणार नाहीत.मुले आई वडिलांना विचारतील, आई मी पण एकदा बूट पालिशवाला होउन पाहू का? म्हणजे वास्तविकता कळेल. मग मुलांचा आदर्श अमिताभ बच्चन स्वभिमानी. हा चित्रपट पाहून मुलांना बिडी ओढणे स्वभिमानी वाटू लागेल. स्वाभिमानाची कल्पना स्वातंत्र्यवीरांकडे पाहून, त्यांची चरित्रे वाचून येत नाही.
आता मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी चित्रपट माध्यम किती प्रभावशाली आहे पहा-
- आईबद्दल प्रेम दिवार,मा,
- देशाबद्दल प्रेम उपकार, L.O.C.कारगील, हकीकत,
- मित्रता दोस्ती, शोले,
- माणुसकी जिस देशमे, दो आखे बारह हाथ,
- शत्रूवर मात शोले,
वरील सर्व गुण मुलांच्या अंगी उतरवायचे असतील तर शाळेत फक्त सिनेमावरच धडे पाहिजेत.
नृत्यकलेसाठी मल्लिका शेरावत, राखी सावंत यांचे तास ठेवावेत.
फळा, खडूची गरज नाही, वर्गात मोठा पडदा लावायचा, सिनेमा दाखवायचा बस्.
मुलांनाही दप्तराचे ओझे नको, विषयवार C.D. नेल्या तर भागेल.
कविता काढून टाकाव्यात आणि चित्रपटातील गाणी ठेवावीत. गाणी किती प्रकारची आहेत- आईवर, देशावर, मित्रावर, जीवनातील तत्वज्ञानावर, निसर्गावर, प्राणीमात्रांवर, ईश्वरावर, कितीतरी विषयांवर. शिवाय चाली किती छान पाठांतराचा त्रासच नाही.
No comments:
Post a Comment