मध्यंतरी मला एक पत्ता शोधून कार्यक्रमाला जायचे होते म्हणून रस्त्यात एका सुशिक्षीत माणसाला विचारले, तर त्याने बाजूला नेउन मला कसे जायचे ते सांगितले. आता त्याच्याच भाषेत त्याने मला कसे माझ्या पत्त्यावर पोहोचवले ते पहा.
" इथून पंधरा नंबरची बस पकडा. या मार्गाचे नाव आहे, जोशी मार्ग. हे जोशी म्हणजे या गावातील खूप मोठे प्रस्थ. त्यांचे चार बंगले होते, त्यांची मोठी शेती होती. ते रोज सकाळी मंदिरात मोठा दानधर्म करत. हा रस्ता आधी खूप छोटा होता. या रस्त्यावर नेहमी अतिक्रमण होत होते. लोकांना फार त्रास होतो. मग आम्ही मोर्चे काढले. ता शहराचा हजार वर्षांचा इतिहास आहे. येथे मोगलांनी राज्य केले. आताच्या नगरपालिकेत भ्रष्टाचार आहे." वगैरे वगैरे. एवढे होईपर्यंत अजून चार जण जमले. त्यांनी पत्ता सांगण्यात अजून गोंधळ करून ठेवला, पण आता हे सर्व ऐकण्यात खूप वेळ गेला. ते काय सोडायला तयार होत नव्हते, बरं मी नवीन असल्यामुळे ऐकणे भाग पडले पण याचा परिणाम कय झाला. एवढे ऐकताना पुढचं विसरलो, उशीर झाल्याने कार्यक्रम संपला होता. माझा उद्देश होता पत्त्यावर पोहोचणे, पण यालोकांनी बाकी शिकवण्यातच मला माझ्या ध्येयापासून दूर केले. आत्ताचे शिक्षण असेच आहे, जगात कशाची गरज आहे, जग कुठे चालले आहे, याचा विचार सोडून आपण वेगळाच अभ्यास करत आहोत. आयुष्याची महत्वाची पंचवीस वर्षे वाया घालवत आहोत, जिथे सरासरी आयुष्यच पन्नास वर्षांचे आहे.
असाच एकदा रस्त्यात अपघात झाला होता, खूप गर्दी जमली होती, सर्वजण एकमेकाला शिकवत होते, शिवाय त्याला गाडी कशी चालवावी, नियम कसे पळावेत, सांगत होते पण त्याला कोणीही दवाखान्यात नेत नव्हते, तो बिचारा तडफडत होता. त्याला काय पाहिजे याचा कोणीही विचार करत नव्हते. त्याला उपचारांची जरूरी आहे, तेव्हा मात्र सर्वजण निघून जातात. असेच शिक्षणाचे झाले आहे, सर्वजण शिकवून मोकळे होतात, पुढे कोणीही मदतीला येत नाहीत, विद्यार्थ्याला वार्यावर सोडून देतात. शिक्षकाला विचारा मला त्रिकोणाच्या रचना शिकवल्या संसारात काय उपयोग आहे? मी जे वाण्याचे दुकान चालवतो तेथे काय उपयोग?
असेच आताचे शिक्षण झाले आहे. मुलाला पुढे काय करायचे आहे तो विचार नाही, या ज्ञानाचा भविष्यात उपयोग आहे काय? बस शिका. मूल अडीच वर्षांचे झाले की शाळा, त्याचा खेळण्याचा कोणीही विचार करत नाही. त्याला काहिही कळत नसते, कोण शिवाजी, झाडे कसे अन्न तयार करतात, पाउस कसा पडतो वगैरे. त्याला खेळू द्या. आनंद घेऊ द्या.
नंतर अभ्यास सुरू होतो. पाहु यात एकेक-
मातृभाषा व्याकरण- समास, अलंकार, काळ, कर्तरी, कर्मणी प्रयोग खूप काही, याचा रोजच्या बोलण्यात काय उपयोग आहे काय?नवीन मूल बोलायला शिकते त्याला काय आई व्याकरण शिकवते काय? मूल व्याकरणात बोलते काय? मला व्याकरणा अजिबात येत नाही सांगा मला बोलता येणार नाही? काय अडतंय. इंग्रजीचे व्याकरण मुलगा रात्र रात्र जागून पाठ करतो, पण त्याला नी्ट बोलता ययेत नाही. भाषेच्या पुस्तकातील धडे काय तर लेखिकेला पाडावरचा चहा कसा आवडला, कोणत्या तरी अगम्य भाषेत लिहीलेली नल दमयंतीची कथा, लेखकाने बालपणी काढलेले कष्ट, प्रवास वर्णने, ती तर आता जुनी झालेली असतात, तेथील आता सर्व बदललेले असते, त्याचा काय उपयोग, विद्यार्थी ते घेउन जाऊ शकतो काय? मुलांना निबंध लिहायला सांगतात, मी पक्षी असतो तर विनोदच आहे ना? तो पक्षी असून काय करणार आहे? उन्हाळ्यात परीक्षा देताना निबंध असतो पावसाळ्यातील एक दिवस आहे ना गंमत. काना मात्रा लक्षात ठेवा, बघा मि असा लिहीला काय आणि मी असा. शेवती मी मीच ना? आणि मधला णि पहिला काय आणि दुसराअ काय? अर्थात फरक पडतो काय? एका शब्दाला अनेक शब्द सुर्याची अनेक नावे रोजच्या जीवनात एवढ्या वेगवेगळ्या नावानी आपण सुर्य म्हणतो काय? मग कशाला एवढा खटाटोप. आता मी एवढ्या वेळेला सु र्ह्स्व काढलाय, सूर्य बदलला की तुम्हाला अर्थ नाही कळला? पत्रलेखन असते, काकाने घड्याळ पाठवले आभार माना. अरे ज्याला काकाच नाही किंवा त्या काकाची परीस्थिती नाही हे ज्या विद्यार्थ्याला माहित असते, तो काय निबंध लिहीणार, खोटा खोटाच ना? शिकवा त्याला खोटी कल्पना करायला.
उत्तरार्ध अपूर्ण- यापुढील भागात दुसर्या विषयाचं बघू.
No comments:
Post a Comment