ज्योतिषी पत्रिकेवरून भविष्य पाहतात, खरे आहे, पण मला वाटते ते लोक आताच्या परिस्थितीवरून भविष्य सांगत असावेत. आता माझेच उदाहरन घ्या ना, साधारण १० वर्षांपूर्वी माझी परिस्थिती बेताचीच होती, मुले शिकणारी, पगार पोटापुरताच, राहण्याचे घर अगदी १०० वर्ग फूट सुद्धा नाही. त्या वेळेस मी पत्रिका दाखवली, अत्यंत निष्णात अशा ज्योतिषीला, काही नाही त्याने सांगितले पत्रिका छान आहे.बस्. आता ह्या सगळ्या परिस्थितीवरून भविशःयाची काय अपेक्षा करावी.
झाले, नंतर मुलांचे शिक्षण झाले, मुलगा अमेरिकेला आला, मुलीचे चान लग्न झाले, तिला करोडोची मालमत्ता असलेले सासर मिळाले, ती आता ऑस्ट्रेलियात आहे. आमचे लहान घर असूनही आम्ही मोठे घर घेतले, चांगलेच मोठे. मी स्वतः तिसर्यांदा परदेशात आलो, मग असा प्रश्न पडतो की त्या वेळेस असे भविष्य कोणी का सांगितले नाही, अहो आमची परिस्थितीच अशी होती की, कोणी हे भविष्य सांगण्याचे धाडसच केले नसते. म्हणजेच काय की, प्राप्त परिस्थितीच कारणीभूत असते. हा आता जर मी पत्रिका दाखवली तर मात्र सगळे सांगतील की तुमचे भविष्य फार उज्ज्वल आहे.
आता पहा, भारताचे पंतप्रधान देवेगौडा, चरणदास याचे तरी भविष्य कोणी सांगण्याचे धादस केले असते काय? काही नाही भूकंप झाला की, हे लोक उठतात आणि सांगायला सुरूवात हा भूकंप होणारच होता, अरे पण शहाण्या आधी सांगितले असते तर लोकांचे प्राण वाचले नसते काय? मी तर म्हणतो, अशा लोकांना महत्वाची माहिती लपवली म्हणून शिक्षा करायाअ पाहिजे.
पत्रिकेवरून भविष्य म्हणजे काय तर फक्त ठोकताळे.
म्हणून फक्त प्रमाणिकपणे कष्ट करावे, आणि भविष्य घडवावे.
जे भविष्य पाहतात, त्यांचे तरी त्यांना कोठे माहित असते.
1 comment:
mi ya sarva gostivar visvas thevato
Post a Comment