सॅल्युट माणेकशॉ

सॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ यांना आमचा सलाम. "भारतरत्न" देण्यावरून मागील वर्षी एवढे वाद झाले, सर्वांचे स्वार्थ कळले, लाचारी कळली, कोणीही योग्य व्यक्ती भेटली नाही, म्हणून पुरस्कार दिला गेला नाही, पण ’सॅम" साहेब आपले नाव कोणालाच सुचले नही हे आमचे दुर्दैव.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3173757.cms

सॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ असे लांबलचक नाव धारण करणा-या माणेकशॉ यांचे कर्तृत्वही तितकेच उत्तुंग होते. तब्बल ४० वर्षे भारतीय लष्कराच्या सेवेत असलेल्या शॉ यांनी ब्रिटीशकाळापासून पाच युद्धात भाग घेतला. या काळात त्यांनी भारतीय लष्करासाठी अनेक छोटे-मोठे विजय नोंदवले. पण १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाने त्यांना देशात 'हिरो' करून टाकले. उत्तमोत्तम लष्करी डावपेच, राजकीय मुत्सद्देगिरी आणि सैन्याचे मनोधैर्य उंचावत पाकिस्तानी सैन्याला अवघ्या १४ दिवसांत गुडघ्यावर आणण्याची अचाट कामगिरी त्यांनी केली. दुसऱ्या महायुद्धात शत्रू सैनिकांच्या हल्ल्यांतून ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्यातील धाडस तसूभरही कमी झाले नाही.
अत्यंत मनस्वी, कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी असलेल्या माणेकशॉ यांनी राज्यर्कत्यांची भीड कधीच बाळगली नाही. इंदिरा गांधी यांनाही त्यांच्याबद्दल नितांत आदर होता.
भारतीय लष्करातील गोरखा रायफल्सच्या जवानांशी असलेल्या सख्यामुळे लष्करात ते 'सॅम बहादूर' या नावानेच ओळखले जात. मात्र हा आदर प्राप्त करण्यासाठी शॉ यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. चीनबरोबरच्या युद्धात झालेल्या भारताच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांची बदली अरुणाचल प्रदेशात करण्यात आली. युद्धातून सावरू पाहणाऱ्या सैनिकांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सूड भावनेने झालेल्या या कारवाईचे सोने करत त्यांनी आपली जबाबादारी निष्ठेने सांभाळली. ईशान्येच्या सीमेवरील सैनिकांत त्यांनी जणु प्राणच फुंकले आणि चीनमधून होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घातला. याशिवाय १९७१च्या ९० हजार पाकिस्तानी युद्धकैद्यांची व्यवस्था लावणे असो किंवा दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणांगतीनंतर उद्भवलेला पुनर्वसनाचा प्रश्न असो, माणेकशॉ यांनी प्रत्येक कामात स्वत:ला झोकून दिले. भारतीय सैन्यातील सवोर्च्च पद, अनुभव आणि करारी वृत्ती यामुळे सैन्यात त्यांचा प्रचंड दरारा होता. भारत सरकारने पद्मभूषण व पद्मविभूषण देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. 'फिल्ड मार्शल' हा लष्करातील सवोर्च्च किताब मिळाल्यानंतर १५ दिवसांत ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते तामिळनाडूच्या निलगिरी येथील कन्नूर येथे राहत होते. (वृत्तसंस्था)

पुन्हा एकदा सॅल्युट.

Unknown

No comments: