दैनिक "सकाळ"मधील एक बातमी.
स्त्रियांसह पुरुषही करणार वटसावित्री!
मुंबई - मानवी जीवनाला प्राणवायू पुरवून उपकारक ठरणाऱ्या वटवृक्षाचे स्त्री-पुरुष दोघेही पूजन करून अभिनव व आधुनिक पद्धतीने वटसावित्रीचा सण साजरा करणार आहेत. महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत आय क्लीन मुंबईतर्फे हा उपक्रम आयोजित केला आहे.
पतीला दीर्घायुष्य चिंतण्यासाठी महिला पूर्वापार वटसावित्री व्रत करीत आहेत; पण स्त्रीप्रमाणेच पुरुषालाही तिची गरज असते. त्यामुळे दोघांनीही दीर्घायुष्यासाठी निसर्गाकडे प्रार्थना केली पाहिजे. वटवृक्षाप्रमाणे मानवी जीवनाला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या व प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या वृक्षांची निसर्गाला गरज आहे. त्यामुळे वटवृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वटसावित्री साजरी करण्यासाठी माजी फ्लाईट लेफ्टनंट व आयक्लीनचे अध्यक्ष मधू सावंत गेली अनेक वर्षे स्त्री-पुरुषांना एकत्र आणीत आहेत. महापौर डॉ. शुभा राऊळ यांना ही कल्पना आवडल्याने १७ जून रोजी वटपौर्णिमा उपक्रमात त्या सहभागी होणार आहेत.
बिसलेरी व हिंदुस्थान लिव्हर कंपनीलगतच्या अंधेरी (पूर्व) येथील बी. डी. सावंत मार्गावरील वटवृक्षापाशी हा उपक्रम सकाळी ११ वाजता साजरा केला जाणार असल्याचे वास्तुविशारद सुरेश बर्वे यांनी सांगितले.
या पेक्षाही अजून एक कारण फार महत्वाचे आहे, जरा मुला मुलींचे संख्यांचे गुणेत्तर पहा, मुली आता कमी होऊ लागल्या आहेत, कारण एक वर्ग असा आहे की, त्यांना मुली नकोत, तेव्हा लग्नासाठी मुलगी मिळाली हेच नशीब समजून मुलांनी वटसावित्रीचे व्रत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय मुली मुलांपेक्षा जास्त शिकतात, चांगली नोकरी पटकवतात, मोठमोठ्या क्षेत्रात चमकतात, त्यामुळे मुलांना संधी कमी झाल्या आहेत, काही दिवसांनंतर तर स्त्रियांची सर्व कामे पुरूषांनाच करावी लागणार आहेत, म्हणून पुरूषांना व्रत करावे लागेल कि, हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो.चला या उपक्रमाचे श्रेय श्री. मधू सावंत या गृहस्थांकडेच जाते, हेही नसे थोडके.
No comments:
Post a Comment