देवाचा न्याय

आम्ही लहाणपणी जिथे रहात होतो, तिथे एक कुटुंब होते, त्यात पाच मुले आणि दोन बहिणी. घरी खूप संपत्ती. त्यामुळे मुलांना चांगले वळण नाही.पहिल्या दोन मुलांनी लग्नच केले नाही. मुले दारू पिऊन वडिलांना मारत, आईला शिव्या देत. एका बहिणीचे लग्न करून दिले, २५ तोळे सोने देऊन, पण तिला पहिला मुलगा झाला आणि त्याच दिवशी तो वारला, तो धक्का सहन न होऊन ती वेडी झाली, आणि  तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी आणून सोडले, आजपर्यंत मागील जवळ जवळ ३० वर्षे ती वेडीच आहे. चवथ्या भावाचे लग्न झाले, ती सून अतिशय चांगली, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, तिला दोन मुली झाल्या चवथ्या भावाचे लग्न झाले, ती सून अतिशय कजाग, घरातच नाहीतर बाहेरही, अतिशय भांडकुदळ, सगळॆ वैतागले, पण तिला त्याची पर्वा नाही. यथावकाश तिला मुलगा झाला, अतिशय गुणी, हाच विचार की हिच्या पोटी हा कसा.नम्तर मुलगी झाली, ती ही छान. मग तिने आपला संसार कुणाचीही पर्वा न करता, वेगळा केला. दरम्यान मोठे दोन भाऊ दारू पिउन रस्त्यावर बेवारचपणॆ वारले, बापाने अंत्यसंस्कार केले, त्यामाणसावर दोन मोठी मुले अशा प्रकारे गेल्याचे, आणि २५ तोळे सोने देऊन लग्न करून दिलेली  मुलगी, घरात पाहण्याचे दुःख नशिबी आले. संपती किती काय सांगावी, करोडोत. मग कळले की मुले चाकूचा धाक दाखवून बापाकडून पैसे घेत, तरीही अशा प्रकारे मुले, गेल्याचे बापाला दुःख झाले आणि त्यातच बाप गेला. आईला नंतर मोठी सून सांभाळू लागली. आता मोठ्या सूनेच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या, लहान मुलीने पळून जाऊन लग्न केले, पण तो मुलगा व्यसनी होता म्हणून, मुलगी परत घरी आली, मोठ्या मुलीचे लग्नच ठरत नव्हते, उशीरा ठरले, पण तिला एक मतिमंद मुलगी झाली आणि ती मुलगी बाळंतपणातच गेली. तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला घरी आणून सोडले, तेव्हा त्या मतिमंद मुलीचीही जबाबदारी या सूनेच्या अंगावर आली, पण हिचा देवधर्म मात्र नित्य चालू होता.  दरवर्षी न चुकता वारी करायची, कुलदैवताचे करायची, पण हिच्या नशिबी मात्र हे सगळे भोग, आम्ही म्हणायचो, हाच काय देवाचा न्याय?

धाकट्या सूनेचा मुलगा चांगला शिकला,मुलगी दिसायला सुंदर म्हणून तिला सासर चांगले मिळाले, सगळा आनंदी आनंद, पण बाई कधी देवधर्म करणार नाही, सासूला बघणार नाही, नेहमी आजूबाजूला भांडणा. सगळे वैतागलेले ,  इथे सुद्धा तोच प्रश्न, हाच काय देवाचा न्याय?

दरम्यान, मोठ्या सूनेचा नव्ररा खूप दारू प्यायला लागला, आणि दुर्दैवाने त्याने  एका रात्री त्या माणसाने गळ्फास घेऊन आत्महत्या केली, तेव्हा पोलीसांचा ससेमिरा चुकवतांना त्या सूनेला नको नको  झाले. काय कराणार. नवरा वारल्यावर धाकट्या सूनेने त्रास ध्यायला सुरूवात, तेव्हा ती सून घर सॊडून, ते भाड्याने देऊन, माहेरच्या जवळ एक खोली घेऊन राहू लागली. ते पाहून हे सून त्या भाडेकरूला त्रास गेऊ लागली म्हणून भाडेकरू राहिनात, आणि या सूनेने या संधीचा फायदा घेतला, आणि ती जागा एकदम कमी किंमतीला विकत घेतली.

नीट पाहिले तर विसंगती लक्षात येते, देवाचा न्याय काय असेल.

मला वाटते, पाप पुण्य कोणी ठरवायचे, ते त्यानेच ठरवायचे. त्यानेच न्याय करायचा. त्यावर आपण काहिही भाष्य करू शकत नाही.

या सर्वात महत्वाचा मुद्धा असा कि, त्यासर्वांचा बाप ज्याने स्वकष्टाने संपत्ती जमवली, व्यसन केले नाही, अतिशय देवभोळा, मदतील सर्वात पुढे, त्याच्या नशिबी हे सर्व यावे, यालाच देवाचा न्याय म्हणावा काय?

Unknown

No comments: