पी.एच्‌.डी

University  मध्ये कोणतातरी विषय घेऊन लोक प्रबंध सादर करतात, आणि त्याला मान्यता मिळून स्विकारला जातो, आणि त्याला डॉक्टरेट पदवी मिळते.

आता या साठी एवढे कष्ट करतात, दोन पाच वर्षे संशोधन करतात, पण त्या संशोधनाचा काही उपयोग होतो या कडे कुणी लक्ष देते काय? भविष्यात असे कुठेही पाहण्यात येत नाही की, त्याचा कोठेतरी उपयोग झालेला आहे. University घेत असणार आणि बस बासणात गुंडाळून थेवत असणार. बरे त्यांचे विष्य इतके मजेशीर असतात कि नाही, प्रश्न पडावा असे विषय यांना कसे मिळतात.

आजच पाच PhD दिल्या त्यांचे विषय पहा, 

१) अनिल अवचट यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास  २) मराठी संज्ञा प्रवाही कादंबरी:एक चिकित्सक अभ्यास ३) Human rights in Manipur:A social work perspective. आता या विषयांमध्ये PhD करण्यासारखे काय असेल देव जाणे आणि त्याचा देशाला किंवा भावी पिढीला काय उपयोग माहित नाही. मागे तर असे विषय होते, आदिवासींच्या जीवनाचा तुलनात्मक अभ्यास, कवी बोरकरांच्या काव्यातील सौंदर्यस्थळे, महाराष्ट्रात रुजलेली लोककला. अरे, काय विषय घ्यावेत याला काही मर्यादाच नाहित. खरे तर Universityने आता विषय ठरवावेत आणि त्यातून विषय निवडून PhD करायला सांगावे. आतापर्यंत जेवढ्या विषयांवर PhD दिल्या गेल्यात त्यांची यादी Internet वर प्रसिद्ध करावी आणि सर्वांना ते थिसीस उपलब्ध करून द्यावेत.

खरे तर आज भारताला मोलाच्या विषयांवर संशोधन करणारे पाहिजेत, ते विषय घ्याना, उदाहरणार्थ -

१) पुण्यातील वाहतूकीच्या खेळखंडोबाचा समग्र अभ्यास

२) महानगरपालिका, न्यायालय, महसूल खाते, R.T.O. यांच्यातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या आलेखाचा चुलनात्म अभ्यास.

३) लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेला फायद्यात आणण्यासाठी वापरललेच्या कलेचा तपशीलात्मक अभ्यास.

४) काही अधिकार्‌यांची वर्षानुवर्षे बदली होत नाही, त्यासाठी त्यांनी केलेल्या युक्त्यांचा सखोल मागोवा.

५) पुण्यातील BRT प्रकल्पातून कोणाकोणाचे आर्थिक संबंध पक्के झाले, आणि त्यांचा कसा विकास झाला.

‍६) भारतरत्न देण्यावरून झालेल्या गोंधळाचा समग्र इतिहास.

७) मागील ५० वर्षातील टप्प्याटप्प्याने वाढलेल्या महागाईचा समग्र आणि तुलनात्म अभ्यास आणि त्याची सरकारवर नसलेली जबाबदारी यांचा तुलनात्मक अभ्यास.

८) मागील दहा वर्षात लाखोंनी दहावी पास झालेल्या विद्यार्थी आज कोणत्या परिस्थितीत आहेत, आणि पुढील मुलांचे भविष्य यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यामुळे झालेल्या वाटोळ्याला जबाबदार असणार्‌यांच्या कामगिरीवर संशोधनात्मक प्रबंध.

९) निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर  होईपर्यंत उमेदवारांनी केलेल्या कष्टांचा समग्र इतिहास आणि मागोवा.

असे अजून कितीतरी जिव्हाळ्याचे विषय आहेत की, त्यावर संशोधन होणे जरूरीचे आहे, ज्याचा फायदा भावी पिढीला होऊन त्यांचे जीवन उजळून निघेल.

पुढील वेळेस अजून मोठी यादी सादर केली जाईल, शिवाय कोणाला काही विषय सुचवावयाचे असतील तर स्वागत आहे. 

Unknown

No comments: