बेकारीचे पीक

आजच दहावीवा निकाल लागला आणि भविष्यातील रोजगरांच्या संधींचाही निकाल लागला. नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे पास विद्यार्थ्यांची संख्या ८७ टक्के आहे, म्हणजेच १३ टक्के नापास झालेत. औरंगाबादमध्ये तर ९०% पास झालेत. परिक्षेला १३,८९,४४६मुले बसली आणि ११,९९,४६८ मुले पास झली.

http://www.esakal.com/esakal/06272008/Specialnews144356BBAB.htm

दहावीत उत्तीर्णांचा उच्चांक
पुणे, ता. २६ - दहावीच्या परीक्षेत ७८.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांच्या टक्केवारीचा उच्चांक नोंदविला गेला आहे.
यंदा प्रथमच दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांत उत्तीर्ण होणारांचे प्रमाण ८६.३३ टक्के आहे. या विक्रमी निकालामुळे अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्‍न तीव्र होण्याची शक्‍यता असली, तरी पात्र असणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळेल, अशी ग्वाही शिक्षण विभागाने दिली आहे.
नव्या अभ्यासक्रमानुसार प्रथमच घेण्यात आलेल्या या परीक्षेत सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचा गौरव गिरीश कुलकर्णी ९७.८४ टक्के (सहाशे पन्नासपैकी ६३६) गुण मिळवून राज्यात पहिला आला. नेहमीप्रमाणे यंदाही निकालावर मुलींचे वर्चस्व आहे. कोल्हापूर वगळता अन्य सातही विभागीय मंडळांत मुलीच प्रथम आल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही (८२.३६ टक्के) मुलांपेक्षा (७६.३२ टक्के) अधिक आहे. पुणे विभागात अहिल्यादेवी हायस्कूलची बिल्वा उपाध्ये ९६ टक्के (६२४) गुण मिळवून पहिली आली असून, विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण ८०.६९ टक्के आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे आज हा निकाल जाहीर करण्यात आला.
अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षेच्या स्वरूपातही मंडळाने काही बदल केले होते. गणित आणि विज्ञान; तसेच इंग्रजीसह अन्य दोन भाषा विषयांमध्ये संयुक्तपणे उत्तीर्ण होण्याची सवलत देण्यात आली होती. त्याचबरोबर सर्व विषयांच्या अंतर्गत मूल्यांकनासाठी वीस टक्के गुण देण्यात आले होते. या साऱ्यांमुळे उत्तीर्णांची टक्केवारी वाढली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल आठ टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
मंडळाच्या अध्यक्ष विजयशीला सरदेसाई म्हणाल्या, ""इंग्रजी व गणित वगळता इतर सर्व विषयांचा निकाल ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागला. ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी निकाल असलेल्या ५९३ शाळा राज्यात आहेत. १८.३७ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविले. साठ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३९ टक्के आहे. नऊ टक्के विद्यार्थी ३५ ते ४५ टक्के यादरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.''
नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून राज्यातून १५ लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७६.३२ टक्के मुले, तर ८२.३६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. नियमित विद्यार्थ्यांमध्ये ८५.४३ टक्के मुले, तर ८७.४१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
-----------------------------------------------------
गुणांच्या टक्केवारीतही वाढ
राज्यातील मानकरी
मुलींमध्ये पहिल्या - सायली रूपसिंह सागर (उमरगा) आणि पूजा वानखेडे (यवतमाळ) ९७.२३ टक्के
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ टक्के
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव (बालमोहन विद्यामंदिर, मुंबई) ९६.४६ टक्के
रात्र प्रशालेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (शिवाजी नाईट हायस्कूल, नागपूर) ८८.१५ टक्के
-----------------------------------------------------
विभागनिहाय निकाल (नियमित व पुनर्परीक्षार्थी)
पुणे - ८०.६९
नागपूर - ६७.९९
औरंगाबाद - ८३.४३
मुंबई - ८०.९८
कोल्हापूर - ७९.८६
अमरावती - ७६.७५
नाशिक - ८०.६०
लातूर - ८३.१३
-----------------------------------------------------
नवा अभ्यासक्रम
सर्वाधिक निकाल - औरंगाबाद विभाग ८९.४५ टक्के
सर्वांत कमी - कोल्हापूर विभाग ८५.८७ टक्के
-----------------------------------------------------

सर्वांना आनंद झाला, पण कोणी हा विचारच करत नाही की, अभ्यासक्रम सोपा केला म्हणून संख्या वाढली, बुद्धिमत्ता नव्हे. आत यातील साधारण ८०% ले ( साधारण १० लाख )पदवीधर होतील, सहा वर्षांनंतर, त्यांच्या नोकरीचे काय? पूर्वी निकाल जेमेतेम ६०% लागायचा तेव्हा सगळ्या बाबी balance व्हायच्या, सर्व प्रकारचे काम करणारे हात तयार व्हायचे, ITI मधून मुले बाहेर पडत, ते कारागीर असत, काही पदवीधर होत, पण आता काय सर्वच उच्चशिक्षीत, मग हलकी कामे कोण करणार? जेवढी जास्त मुले पास होणार तेवढा जीवनाचा तोल ढासळणार, industries, business, crafts, हे एक प्रकारचे पर्यावरणच आहे, त्याचा सुद्धा तोल राखायचा असतो. परदेशात सर्वा उच्चशिक्षीत, त्यामुळे घरकामाला कोणी मिळत नाही, तेव्हा ते हाल त्या लोकांनाच माहित.

किती मुले पास होतात, याहीपेक्षा किती हुषार intelligent मुले बाहेर पडतात याचा विचार होणे जरूरीचे आहे. आजच बेकारी भयंकर आहे, त्यात ही अशी भर. भारतात सुशिक्षीतांची बेकारी फार आहे, पण कामवाली बाई मिळत नाही, तिचा रूबाब काय सांगावा? ती engineer पेक्षा जास्त कमावते.

P.Hd. करणार्‍यांनी या विषयावर कि, यी ९०% कार्क मिळविलेल्या मुलांचे पुढे काय होते? माझ्या माहितीत एक मुलगी होती, अतिशय हुषार. दहावीला तिला ९२% मार्क मिळाले, मराठी माध्यामातून, फार मोठे स्वप्न घेऊन ती सायन्सला, डॉक्टर होण्या साठी गेली, पण काहीही इंग्रजी न कळल्याने तिला बारावीला फक्त ५६% मार्क मिळाले, त्या नैराश्येपोटी तिने शिक्षण सोडले, अशी किती मुले असतील देव जाणे.

अभ्याअसक्रम सोपा केल्याने संख्या वाढते, पण सकसपणा नाही वाढत. आजचा हा आनंदीआनंद, उद्याच्या बेकारीचे रडगाणे होणार आहे, याचा विचारच नाही.  एका भाकरीसाठी जेव्हा अनेक वारसदार असतात, आणि त्यांच्या हक्का साठी सोपी स्पर्धा घेतली जाते, तेवा सगळेच जिंकणार आणे शेवटी युद्ध होणार, आणि त्यात कोणाचेच पोट भरणार नाही.

Unknown

No comments: