हा आहे अकरावीच्या प्रवेशाचा घोळ. ७०-३० चा गोंधळ न्यायालयानेच रद्दबादल ठरवला, हे एक बरे झाले. हे सर्व निर्णय आधी होत नाहीत तर अगदी ऐनवेळी घेतले जातात, आणि गोंधळाचे वातावरण तयार केले जाते.
पर्सेंटाइल पद्धत म्हणजे विनोदच आहे. मुळात भारतात अशी वेगवेगळी बोर्ड का ठेवावीत, कळत नाही. सर्व भारतभर एकच अभ्यासक्रम ठेवला तर, सबंध देशातून कोणीही कोठेही प्रवेश घेऊ शकेल. महाराष्ट्र बोर्डातून पास झालेला, CBSE, ICSC बोर्डातून पास झालेला अकरावीला एकाच वर्गात बसतो ना? पण त्यांच्या मनात कुठेतरी तुलना सुरू असते. खरे तर भारतभर एकच अभ्यासक्रम असावा. फक्त त्या त्या राज्याची भाषा शिकवली जावी, एवढेच काय तर भाषासुद्धा ऐच्छिक ठेवावी. आता हा किती वैताग आहे ना? एवढ्या वर्षे बरोबर चालले, पण आता मात्र problem आला. नाहितरी भारतातील विद्यार्थ्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. शिक्षणमंत्र्यांना तर या गोष्टी पहायला वेळच नाही, विद्यार्थ्यांच्या हिता पेक्षा त्यांच्याकडे इतर कामे भरपूर आहेत.http://www.esakal.com/esakal/07192008/Pune22E2D65DCA.htm
अकरावी प्रवेश - "पर्सेंटाईल' सूत्रानुसारच; सोमवारी यादी
पुणे, ता. १८ - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. २१) जाहीर होणार आहे. राज्य सरकारने या वर्षीपासून लागू केलेल्या "पर्सेंटाईल' सूत्रानुसार ही यादी जाहीर करण्यात येणार आहे.
"सीबीएसई' परीक्षा मंडळामार्फत परीक्षा दिलेले पंधराशे आणि "आयसीएसई' मंडळामार्फत परीक्षा दिलेल्या आठशे विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी अर्ज केले आहेत. दोन्ही मंडळांचे एक हजार ३०० विद्यार्थी आहेत. या वर्षी प्रवेशासाठी ५० हजार २१५ जागा उपलब्ध असून, प्रत्यक्षात ४९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. प्रवेशक्षमतेपेक्षा एकूण अर्ज कमी असले, तरी विज्ञान आणि वाणिज्य मराठी व इंग्रजी अभ्यासक्रमाचे अर्ज उपलब्ध जागांपेक्षा अधिक आहेत. याउलट कला शाखेच्या दोन्ही माध्यमांच्या सुमारे सत्तर टक्के जागा रिक्त राहणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी दोन अभ्यासक्रमांना अर्ज केल्याचे गृहीत धरले तरी पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या तुकड्या वाढवाव्या लागणार आहेत.
या अभ्यासक्रमांच्या सध्या उपलब्ध जागा आणि कंसात प्रवेशासाठीचे अर्ज असे- कला (मराठी) : ६९८० (१,८२५), कला (इंग्रजी) : २,७०० (७३९), वाणिज्य (मराठी) : ८,९०० (१०,१४७), वाणिज्य (इंग्रजी) : ११,७४० (१३,१४६), विज्ञान : १७,२७० (२३,३३८).
पुण्यात केवळ उच्च शिक्षणासाठीच देशातून विद्यार्थी येतात असे नाही. राज्याच्या इतर भागांतून; तसेच परराज्यातून अकरावीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कला शाखेच्या जागा रिक्त राहणार असल्या, तरी वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागांची कमतरता भासणार आहे. गरजेनुसार तुकड्या वाढविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढली तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे विभागीय उपसंचालक जी. के. म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
---------------
पर्सेंटाईल म्हणजे?
"पर्सेंटाईल' हे संख्याशास्त्रातील सूत्र आहे. या सूत्रानुसार प्रवेश द्यावेत, असा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला आहे. या सूत्रानुसार "सीबीएसई' व "आयसीएसई'च्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढण्यात येईल. त्यास शंभरने भागून येणाऱ्या आकड्यावरील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment