भारतात एक कायदा पास झाला, सुप्रीम कोर्टाने, शिक्कामोर्तब केले, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट प्यायला बंदी. भारतात जनता पान तंबाखू खाऊन पचापचा थुंकते, रस्ते लालीलाल करते, बसमध्ये बसून लोकांचे कपडे रंगपंचमीसारखे रंगवते त्यांना काही कायदा नाही. सिगारेट शौकिन सिगारेट ओढताना धूर काढतात, तो हवेत विरून जातो, पण या रंगार्यांचे काय? दारूच्य दुकानात बिअरची कॅन विद्यार्थी पीत उभारतात, त्यांच्या कडे कुणाचेही लक्ष नाही. आणि बिचारे सिगारेटवाले बरे सापडले.
गुटखा तर राजमान्यच झालेला आहे, त्याचे दुष्परिणाम तरूण पिढी भोगती आहे. तरूण पिढी तर सिगारेटला हात लावत नाही, हे फार हलके व्यसन झाले, त्यांना पाहिजे गुटखा, दारू ( अजून भरपूर काही).
भारतात कोर्ट कोणत्या कामात लक्ष घालेल, पत्ता नाही. एवढे खटले प्रलंबीत आहेत, एवढे साधे कैदी तुरूंगात सडताहेत, त्याचे काही नाही, कोणताही विषय घ्यायचा, ( जनहितार्थ याचिका दाखल करायला काय लागतंय) आणि त्यावर गुर्हाळ लावायचे. खरं तर आता जनहितार्थ याचिका दाखल करण्याची रूपरेखा ठरवण्याची वेळ आलेली आहे.अरे एवढी लोकसंख्या भराभर वाढती आहे, होऊ द्या की कमी.
बंदीच आणायची तर, सायबर कॅफे मध्ये विद्यार्थी नको त्या साईट बघतात त्यावर आणा.
No comments:
Post a Comment