http://www.esakal.com/esakal/10092008/Specialnews20416194EE.htm
आमच्यावर कायद्याचा उलटा आसूड का उगारला जातो आहे?
मी एक सामान्य स्त्री. समाजातल्या कोणत्याही सामान्य, मध्यमवर्गीय घरात आढळणारी. माझं घर, संसार, शिक्षण इतर कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणेच. परवा मी आयुष्याच्या वेगळ्या वळणावर येऊन उभी राहिले. एका अनपेक्षित, दुर्दैवी घटनेने माझं घर हादरलं. आमचा नीतिमूल्यांवरचा विश्वास उडाला. आमच्या घरातल्या अलीकडेच कामाला लागलेल्या मुलीने समोर आलेल्या वडिलांच्या- पोलिसांच्या भीतीने थेट आत्महत्या केली... वरच्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे ती निधन पावली. आम्ही सारे जण नखशिखांत हादरलो. गांगरून गेलो... काय करावं हे कळेना. थोड्याच वेळात पुढचे सोपस्कार सुरू झाले. पोलिस, वकील, हितचिंतक जमा झाले
दैनिक सकाळ मधील अगतिकता. असे अनुभव अनेकांना येतात, पण कोणी पुढे येत नाही. कारण आजूबाजूची मंडळी खरे खोटे न पाहता, इतक्या दिवसांचा सहवास विसरून, यांनीच काहीतरी केले नसेल ना? अशा अविश्वासाच्या नजरेने पाहतात. आता हे कुटुंब अडकले, पैसापरी पैसा जाईल, शिवाय मानहानी वेगळी. यांना खूपच आर्थिक व्यवहार करावे लागतील. वकील मंडळी तर ताणून धरतात, म्हणतात काही काळजी करू नका मी आहे ना? जुळवून घ्यायच्या ऐवजी लावून देतात. खरं तर पोलीसांना कळत असते, पण ते तरी काय करणार, तक्रार आल्यावर. आता कोर्ट बाजी आली, पैसा आला. ह्या कुटंबाचे दुर्दैव बाकी काय?
माणसानं मध्यमवर्गीय नसावं. कोणीही उठतं आणि पेकाटात लाथ घालतं.मग आपण कुत्र्यासारखं केकाटत बसायचं. सरकारचे कर भरायचे, भिऊन रहायचे. झोपडपट्टीत राहणारा सुखी. राजकारणी सुखी. मी तर म्हणतो भिकारी अत्यंत सुखी, त्याचा शर्ट मागून घ्यावा.
हा लेख वाचा, आणि जर कोणाजवळ उपाय असेल तर सुचवा.
No comments:
Post a Comment