भारतत निवडणुका जाहीर झाल्या आणि एकच गडबड. सगळे अगदी बांशिंग बाधून बोहल्यावर चढले. पाच वर्षे मतदारांना न ओळखणारे अच्च्नक ओळख दाखवू लागले. सर्व पक्षांनी आपापली जाहिरनामे, वचननामे जाहीर केले. पक्षात जाणकार जुने जाणते नेते मंडळी असतात, पण त्यांना एवढे साधे समजू नये की, मतदार आता कोणत्याही भूल थापांना फसणार नाहीत ते.
कॉंग्रेसने तीन रूपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले, तर लगेच भाजपाने दोन रूपये किलोचा भाव लावला. आता दुसर्या पक्षाने एक किलोचा भाव लावावा. मग दुसरा पक्षतर पैसेच घेणार नाही, फुकट घरी अन्न धान्य. मतदारांना आता काम करायची गरजच काय? सगळं आयतं म्हणल्यावर कोण काम करेल. मग त्यांना काय काम उरणार, पाठवा मग सैन्यात, लढू द्यात तालीबानींशी, अतिरेक्यांशी. जर सगळम कसंफुकट तर शिक्षणा तरी कशासाठी?
कसे राजकारणी लोकांना आळशी बनवतात ना?
कोणीही मागील वचननामा दाखवून त्याप्रमाणे काम केले काय हे बोलत नाही. आणि मतदार तरी जुना मागील वचननामा लक्षात ठेवतात काय?
आर्थिक मंदीवर कोणी बोलत नाही, कायदा सुव्यवास्थेबद्दल कोणी बोलत नाही, स्त्रीयांच्या प्रश्नाबद्धल अवाक्षरही नाही, शेतकरी आत्महत्या करतात याचे कोणाला दुःख आहे काय?
हे जे वचवनामे आहेत ना हे कोर्टात जाऊन शपथपत्र, न्यायधीशासमोर करायला पाहिजेत आणि जर त्याप्रमाणे काम केले नाही तर त्या त्या निवडून आलेल्या उमेदवाराला सजा दंड ठोठावला पाहिजे, आणि त्याने दर वर्षी तसा अहवाल न्यायालयात सादर करायला पाहिजे. मगच असले निरर्थक वचननामे जाहीर करताना जरा तरी लाज बाळगतील.
1 comment:
Khapre Saheb...
Tumachya web soochi var mazya blog chee link devu shakata.. arthat blog tya yogyatecha asel tarach... Jarur Kalawa
Blog - http://minanath.blogspot.com
Dhanyawaad
Post a Comment