मतदान करणे हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे हे अगदी ठासून सांगितले जाते, पण अशा अयोग्य उमेदवारांना मत देऊन आपण काय साधणार आहोत समजत नाही. सुशिक्षित मतदार मतदान टाळतो. तो सर्व समजतो म्हणूनच ना. अशिक्षित उमेदवाराला कळत नसताना तो भावनेच्या भरात मतदान करतो.
उमेदवार जाहिरनामे प्रसिद्ध करतात, ते वाचून कोणाचा विश्वास बसणार आहे काय? असे शक्य आहे काय? मग अशी खोटी आश्वासने देणार्या उमेदवाराला काय म्हणून मत द्यायचे. मागील निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुन्हा उभे आहेत, पण त्यांनी जर मागील आश्वासने पूर्णा केली नाहीत तर त्यांना काय म्हणून मत द्यायचे. या वर्षी तर सर्वांनी बोलण्याचे ताळतंत्रच सोडले आहे. जनतेच्या विकासाबद्दल कोणी बोलत नाही पण एकमेकांची उणीधुणी काढण्याची जण स्पर्धा चालू आहे अशंना काय म्हणून मत द्यायचे? निवडून आल्यावर तो पक्ष बदलणार नाही याची काय हमी. पक्ष बघून मत दिले तर उमेदवार निवडून आल्यावर पक्ष बदलतो तेव्हा चिडचिड होते पण मग मतदान केल्याबद्दल पश्चात्तप होतो, ही वेळ येऊ द्यायची नसेल तर मतदानच नको ना.
हे निवडून दिलेले उमेदवार संसदेत हजेरी लावत नाहीत. तिथे फक्त हेवेदावे काढले जातात. अधिवेशन उधळून लावले जाते. जनतेच्या विकासाचा विचार होत नाही, मग अशा उमेदवारांना मतदान करायचे काय?
मत देऊन निवडून आलेल्या उमेदवाराने कामे न केल्यास, मतदान केल्याचा पश्चाताप होण्या पेक्षा मतदान न केलेलेच बरे.
1 comment:
अत्यंत चूकीचा विचार!!
असा विचार केल्यानेच आता आपली अशी परीस्थिती झाली आहे.
एक प्रकारे जर तुमच्यात विचार करण्याची क्षमता असूनही जर तुम्ही मतदान करणार नसाल तर तुम्ही देशद्रोह करीत आहात.
जागे व्हा. होय हा देशद्रोहच आहे. अशाप्रकारे जर काही लोक विचार करू लागले तर जात पातीवर, विभाजनवादी राजकारण्यांचे फ़ावते. आणि अशी परिस्थिती निर्माण करण्याबद्दल तुम्हीच जवाबदार आहात.
अजूनही विचार करा. तुमच्या मताप्रमाणे, एक तर ४९- ओ नुसार मत कळवा, अथवा, जो त्यातल्या त्यात योग्य उमेदवार आहे, त्याला मत द्या. घरी बसून देशद्रोह करण्यापेक्षा आपले कर्तव्य पाळा.
see: http://parivartan-pune.blogspot.com/
or refer the thoughts by Patanjalee people.
Post a Comment