गीता

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पवयात १८व्या वर्षी समाधी घेतली. महाराजांनी लोकांना गीता समजत नव्हती म्हणून तिचे प्राकृत भाषेत भाषांतर केले, आणि लोकांना गीता समजली. याच ज्ञानेश्वरीवर आज भलेभले व्याख्यान, प्रवचन देतात पण संपत नाही. अहो, हे फक्त प्रवचन देतात पण त्यांना गीता समजलेलीच नाही. गीता समजून आत्मसात करून दिलेले प्रवचन लोकांच्या आत्म्यापर्यंत जाऊन भिडेल.

गीतेचे भाषांतर करताना महाराजांना संस्कृत येत होते का असा प्रश्न पडतो.  वयाच्या  सोळाव्या वर्षी महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली, त्या आधी ते तीन वर्षे ज्ञानेश्वरी लिहीत होते. शिवाय त्या भावंडांना ब्राम्हण समाजाने वाळीत टाकल्यावर त्यांना काशीला जावे लागले, इथे महाराष्ट्रात झगडावे लागले मग त्यांनी आपले संस्कृतचे शिक्षण कोठे पूर्ण केले असेल असा प्रश्न पडतोच ना? त्याच्या चरित्रात त्यांनी कोठेही गुरूकुलात शिक्षण घेतल्याचा उल्लेख नाही. जाणकारांनी स्पष्ट करावे.  

असो तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहील्यावर समाधी का घेतली कारण त्यांना गीता पूर्णपणे समजली होती. मग त्यांना दिव्य ज्ञान झाले की, हे सर्व जग मिथ्या आहे, हे जीवन निरर्थक आहे. गीतेतील तत्वज्ञान त्यांना अचूक समजले, आणि त्यांनी समाधी घेतली. आजकाल एवढे स्वतःला संत महात्मा म्हणवून घेणारे  स्वयंघोषीत आत्मे यांना गीता ज्ञानेश्वरी समजलेलीच नाही, असे म्हणावे लागेल, नाहीतर यांनी सुद्धा ज्ञानेश्वरांचा मार्ग आचरला असता. म्हणून प्रथम यांनी, आधुनिक महात्म्यांनी, गीता ज्ञानेश्वरी समजून घ्यावी, आणि मगच त्यावर भाष्य करावे.

Unknown

1 comment: