जातीचा पंतप्रधान

"देशाचा पंतप्रधान मुस्लिम झाल्या शिवाय मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाहीत" हे तारे तोडलेत जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी.निवडणुका जवळ आल्या की यांना मुस्लिमांबद्दल कळवळा येतो. जणू काही मुस्लिम मतदार आता यांच्या इशार्‍यावरच मतदान करतात. आता मुस्लिम मतदार सुद्धा विचार करू लागलेत. जे मुस्लिम राज्यकर्ते त्यांच्या देशात मुस्लिमांचे भले करू शकले नाहीत, ते इथे हिंदू राष्ट्रात काय भले होणार आहेत?  सध्या बेताल. मनाला येईल तशी खळबळजनक विधाने करण्यात सर्वजण निपुण झालेले आहेत. सर्वजण फुकटची प्रसिद्धी मिळवतात आणि त्यांना महत्व देतात चॅनेलवाले. कारण अशा बातम्यांवरच तर त्यांचे पोट अबलंबून आहे मग ते तरी बिचारे काय करणार?

आता याला शिवसेनाप्रमुख, नरेंद्र मोदी, राज ठाकरे सडेतोड उत्तरे देतील, पण तोंडसुख घ्यायला निमीत्त मिळाले ना. कोणत्याही धर्माचा नेता सत्तपदावर बसला म्हणून त्या धर्माचे भले होते हा विचार केव्हाच बाद झालाय. राजकारण्याला जात धर्म नाती नसतात, त्याला फक्त दिसत असते ती खुर्ची, मग तो कुणाचीही पर्वा करीते नाही. महाराष्ट्रावर मुस्लिम मुख्यमंत्री होते तेव्हा काय मुस्लिमांचे भले झाले. तीन राष्ट्रपती मुस्लिम होते, त्यांनी तोंड तरी उघडले काय? अस्स्ल राजकारणी मतांसाठी जातीचे राजकारण करतो, पण खुर्ची मिळाल्यावर खुर्चीचे राजकारण खेळतो, जात पात सर्व विसरतो.

देशात बहुसंख्य मंत्री संत्री हिंदू आहेत म्हणून काय भारतात हिंदूंचे भले झाले आहे काय? मायावतींनी दलीतांचे भले केले आहे काय? शाही इमामांना असे वाटत असेल की राजकारणी मुस्लिमांची मते मागायला त्यांच्या कडे येतील, तर तो त्यांचा भ्रम आहे.

मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम अधिकारी पदावर असतात म्हणून काय तेथील जनता सुखी आहे, उलट भारतातले मुस्लिम जास्त सुरक्षित आणि सुखी आहेत.पाकिस्तानातील मुस्लिमांचे काय हाल आहेत, तालिबानचे भूत कसे डोक्यावर बसले आहे, हे इमामांना माहित नाही काय?

मुशर्रफ, भुत्तो, आयुबखान, याह्याखान, झरदारी, नवाज शरीफ यांची कारकीर्द धर्माच्या पायावरच उभी होती ना? आता त्या देशातील राजकारण धर्माभोवतीच केंद्रीत झाले असताना सुद्धा तेथील मुस्लिमांची दुरवस्था का आहे? विचारा पाकिस्तानातल्या आणि भारतातल्या मुस्लिमांना कॊणाची परिस्थिती चांगली आहे ते.

लक्षात घ्या विचार सर्व समाजाचा, नागरिकांचा त्यांच्या प्रश्नांचा, प्रगतीचा असतो. जात, धर्म, संघटना, संप्रदाय, यांचा नसतो.

कधीही नसतो.

Unknown

No comments: