नोबेल शांतता पुरस्कार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला, याबद्दल भारतातील पत्रकार वर्तुळात सुद्धा कमालीचे आश्चर्य पसरले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच पुरस्कार दिला गेला, असे त्यांनी काय शांततेचे कार्य केले हे एक देवच जाणो. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानात, अमेरिकन सैनिक पाठवून, त्यांना आधुनिक शस्त्रसामुग्री पाठवणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे काय शांतीदूत बनू शकतात. अमेरिकेचे धोरण आहे, जगाला माण्डलिक बनवण्याचे, अशांना नोबेल पुरस्कार?

समितीपुढे दोन नावे होती, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलाय सारकोझी आणि ओबामा. त्यात निकोलाय यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तेव्हा त्यांच्या नावाचा विचार व्हायला पाहिजे होता. ओबामांने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कोणते बहुमोल योगदान दिले आहे, हा संशोधनाचाच विषय असेल. दीर्घकाळ जागतिक राजकारणात कार्यरत असणार्‍या व्यक्तींचा विचार का केला गेला नाही? रशियाचे पुतीन, भारताचे मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, श्रीमती सोनिया गांधी, अमेरिकेचे जॉर्ज बुश, ब्रिटनचे टोनी ब्लेयर ही नावे समितीला माहीत नव्हती काय?

गेल्या वर्षी महंमद अल बारदेई यांना शांततेचं नोबल मिळाले होते. तेव्हा तर या पुरस्काराची थट्टाच झाली होती. पाकिस्तान इराण, कोरीयाला अणु तंत्रज्ञान स्मगल करते, त्यावर बारदेई नियंत्रण ठेउ शकले नाहीत. इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून ते रोखू शकले नाहीत. मग त्यांनी शांततेसाठी काय केले म्हणून त्यांना हा पुरस्कार? कोफी अन्नान यांना शांततेचा पुरस्कार देण्यात आला, त्याचे काय कर्तृत्व? जेव्हा सद्दाम हुसेन यांनी तेलविक्रीत मोठा घोटाळा केला, जगात त्याची निंदा झाली, त्या घोटाळ्यात कोफी अन्नान यांचा मुलगा होता. त्याच्या चौकशी अयोगाचा निकाल अजूनही आलेला नाही. अन्नान यांच्या काळात आफ्रिकेत हजारो लोक उपासमारीने, युद्धात मारले गेले, महिला लैंगिक वासनेला बळी पडल्या हे अन्नान यांना रोखता आले नाही, अशा माणसाला पुरस्कार? समितीचे डोके ठिकाणावर आहे काय? यात काहीतरी काळाबाजार आहे असे वाटते. बलाढ्य अमेरिकेसमोर समिती झुकली. आठवते? एक अतिशय हलक्या पातळीवरचा पुरस्कार! - इराणच्या सामान्य लेखिकेला दिलेला पुरस्कार ती लेखिका - शिरीन इबादी. काय असेल हिचे शांतता कार्य?

बहुतेक हा पुरस्कार गुणवत्तेच्या कसोटीपेक्षा, जागतीक राजकाराणातील वजन आणि दादागिरीवर देण्यात येत असावा.

सर्व जगतातील सर्व थरातून म. गांधींचे नाव त्यांच्या अहिसा लढ्या संदर्भात घेतले जाते, लोकांच्या माना झुकतात. त्यांनी जी शांती अपेक्षिली होत, तो विचार तर आज पर्यंत कोणालाही शिवला नाही, त्यांना मात्र शांततेचा पुरस्कार नाही. आहे की नाही विनोद. 
भारतीयच शांततेच्या पुरस्काराला कसे पात्र आहेत, याची चर्चा उद्या.

Unknown

No comments: