नोबेलचे (खरे!) मानकरी

आम्ही काल लिहील्याप्रमाणे शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला द्यावा तर आमच्या मते, ज्यांनी शांतता प्रस्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले त्यांना किंबहुना ते सतत त्याच ध्यासात असतात, अशा भारतीयांनाच मिळावा.

मुंबईत जिहादी हल्ल्यात दोनशेहून जास्त माणसे मारली गेली, पाकिस्तानविरुद्ध सज्जड पुरावा मिळून सुद्धा आपले पंतप्रधान मनमोहन सिंग फक्त खलिते पाठवतात, ते शांती राखायचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यांनाच पुरस्कार द्यावा.कारगीलच्या घुसखोरीनंतर वाजपेयी पाकच्या हुकुमशहा मुशर्रफ बरोबर आग्रा येथील शिखर परिषदेसाठी बोलावून चर्चा करतात, त्यांची बडदास्त ठेवतात, पण कारगीलचा मुद्दा सौम्यपणे हाताळण्याचे कसब दाखवतात, ते शांतीदूत नव्हेत काय? त्यांनाच पुरस्कार मिळाला पाहिजे.

भारतीय नेते शांततेची जपमाळ ओढत, जप करीत असतात. भारतातील नागरिक पाकिस्तानी जिहाद, हिंसाचार व स्वकीयांचे हत्याकांड हतबलपणे सोसतात, चकार शब्द काढत नाहीत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा स्वप्नातही काढत नाहीत. अमेरिकेने इराक मध्ये जेवढी माणसे मारली नसतील, त्यापेक्षा जास्त माणसे पाकच्या दहशतवादी हल्ल्यात भारतात मारली गेलीत, तरीसुद्धा जगातल्या कुठल्याही नेत्याने शांततेसाठी स्वकीयांचे इतके ह्त्याकांड सोसून समजूतदारपणा दाखवून,भारतीय नेते पाकिस्तानला न दुखावण्याचा प्रयत्न करताहेत आणि शांततेसाठी ब्लीदान करताहेत, त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, तेच भारतीय नेते खरे नोबेल पुरस्काराचे हकदार आहेत. यांचा विचार झालाच पाहिजे नाहीतर हा पुरस्कारच बंद करून टाकला पाहिजे.

अतिरेकीच खरे या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे  मानकरी आहेत कारण ते माणसांना मारून कायमची शांतता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहेत.

पुढील वर्षी भारतीयांच्या नावांचा जरूर विचार व्हावा, यासाठी शांततेच्या मार्गाने उठाव करावा, असे आम्हांला वाटते.

Unknown

2 comments:

Anonymous said...

जिहादीना हुतात्मा होण्याची संधी न देणाय्रा भारतीयाना नोबेल देण्यात फायदा नाही.

Unknown said...

ase ajun kahi lekh aahet ka aplyakade