आय टी प्रोफेशनल

हजारो वर्षांपूर्वी हे जग निर्माण झाले. पूर्वी माणूस अगदी रानटी होता. कोणतेही शोध लागलेले नव्हते. कपडे नाहीत, अन्न शिजवणे माहित नव्हते. युगे बदलली, रामायण महाभारत होऊन गेले. असं म्हणतात की, त्याकाळी प्रगत समाज होता. पण आदिमानवाचा काळ काय?

मानव प्रगती करू लागला, निरनिराळे शोध लागले, जगण्याची प्रवृत्ती तयार होऊ लागली. मानव मग जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी जमावाने राहू लागला. मग समाज निर्माण झाला, त्याचे कायदे कानून तयार झाले. मानवाला शोधांपासून जगण्याची आशा वाढली. तत्वज्ञान सांगणारी मंडळी उदयास आली. कारण जसे सुख वाढू लागले तसे दुःखही टोचू लागले.

याच उद्वेगातून सर्वसंगपरित्याग करणार्‍या संतमहात्म्यांनी जन्म घेतला. हे संत ऐहिक, भौतिक सुखाचा त्याग करू लागले. त्यांनी वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी, चैनी, अन्न, हास्य, काव्य शास्त्र विनोद सर्वांचा त्याग केला.  मग यांनाच वेगवेगळ्या नावाने संबोधले जाऊ लागले. ऋषी, साधू, संन्यासी, यती वगैरे.

आणि या सांप्रत काळात, असा त्याग करणार्‍या माणसाला आय टी प्रोफेशनल म्हटलं जाऊ लागलं.

Unknown

1 comment:

Anonymous said...

changle i hai