महात्मा गांधीजींचा आज जन्मदिवस, २ ऑक्टोबर. आज त्यांच्या कार्याचा आपण गौरव केला पाहिजे. जगाला अहिंसा शिकवली ती गांधीजींनीच. जगातील हे एकमेव आश्चर्य आहे की अजिबात रक्तेपात न करता, हिंसा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही.
म.गांधींनी अहिंसा तत्व पालनामध्ये प्रेमशक्तीला महत्वाचे स्थान दिले. कारण प्रेम कशाचीच अपेक्षा करीत नसते. त्यांनी प्रथम आपल्यातील परमेश्वराला जाणून घ्यायला शिकवले. त्यातून विनम्रता प्रकट होते. याच विनम्रतेतून आपल्यातील अहंभाव, अहंमन्यता गळून पडते. हिंसेतून जेव्हा फायदा, कल्याण वाटते, ते तात्पुरते असते, पण वाईट परिणाम कायम स्वरूपी असतात. त्यांना शांती पाहिजे होती, पण दुबळेपणा नको होता.
महात्माजींचं कौतुक सार्या जगात होते पण त्याच भारतात मात्र काहीतरी गैरसमजूतीतून त्यांना तेवढा मान मिळात नाही. आज त्यांची जयंती आहे, पण त्यांच्या बद्दल लिहायला वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे ’ संपादकीय ’ लिहायला वेळ नाही. जे कार्य शिवाजी महाराजांनी केले आणि आपली मोगलांच्या तावडीतून सुटका केली, त्याचप्रमाणे इंग्राजांच्या पाशवी जाचातून म. गांधींनी सुटका केली. जर स्वातंत्र हिंसेतून मिळाविण्याचा प्रयत्न झाला असता तर ते अशक्य होते, कारण सत्ता इंग्रजांच्या हातात होती आणि मुख्य म्हणजे आपलेच भारतीय त्यांची सेवा इमानेइतबारे करीत होते, कारण त्यांची ठाम समजूत होती की इंग्रज भारतातून कधीही जाणार नाहीत.
आजच्या पिढीला गांधीजींचे विचार वाचण्यासाठी वेळ कुठे आहे, गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला नैतिक अधिष्टान दिले.
गांधीजी काय किंवा कोणीही थोर पुरूष काय त्यांच्याबद्दल वाईट लिहायचेच ही फॅशन झाली आहे. गांधीजींचे विचार कृतिशील आणि अनुभवसिद्ध होते. गांधीजींचा मंत्र आम्ही जीवनात उतरवू शकले नाही.
चला आज आपण त्यांच्या कार्याचा गौरव करू यात.
2 comments:
"रक्तपात न करता स्वातंत्र्य मिळवून दिले.."
ह्या विधानामुळे असंख्य ज्ञात व अज्ञात क्रंतिकारकांवर अन्याय नाही का होत?? कितीतरी जण फाशी गेले, कित्येकांचे संसार देशोधडीला लागले. कित्येकांनी हसत हसत बलिदान केले.. ह्या सगळ्यामुळे स्वातंत्र्य नही मिळाले असा अर्थ होतो तुमच्या विधानाचा...
he gandhi neheru kartat to tyag aani amche savarkar, vasudev balvant phadke, bhagat sing karata te band .....asli halkat vicharsarni aahe hya gandhivadyanchi.
Post a Comment