साहित्य संमेलन

पुण्यात दि.२६, २७ आणि २८ मार्च या तीन दिवशी अखिल भारतीय मराठी साहिय संमेलनाचे सूप अखेर खूपशा राजकारणीय वादाने गाजले, आणि एकदाचे पार पडले. काही कोटी रूपये खर्च झाले. पण एवढे करून जे सामान्य नागरीक, त्यांना काय मिळाले याचा कोणी विचारच केला नाही.

मराठी पुस्तकांचे स्टॉल लागले होते, पण मराठी पुस्तकांची किंमतच एवढी की घेताना डोळे पांढरे व्हायची वेळ येत होती. पण गाजावाजा एवढा बस्स! किती पुस्तकांमधून किती टक्के पुस्तकांची वेक्री झाली, भेट दिलेल्या एकंदर रसिकांमधून किती टक्के रसिकांनी पुस्तके विकत घेतली हे मात्र जाहीर करणे सोईस्करपणे टाळण्यात आले.

खरंतर एवढे रसिक गावोगावाहून आले होते, एवढ्या देणग्या मिळाल्या पण त्याचा विवीयोग कसा झाला, हे काही सांगायला नको. एवढ्या पैशातून एखादी ज्ञानेश्वरी, तुकाराममहाराजांची गाथा, किंवा रामदासमहाराजांचे मनाचे श्लोक मोफत वाटले असते तर कितीतरी लोकांना फायदा झाला असता. हा विचार देणगी देणार्‍यांनी करायला पाहिजे होता. त्यांनी देणगीरूपाने पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वाटायला पाहिजे होत्या.

ग्रंथ प्रदर्शनात एक मुस्लिम समाजाचा स्टॉल होता त्यांनी त्यांचा धर्मग्रंथ कुराण, ज्याची ९५० पाने आहेत, फक्त ५० रूपयांना विकत दिले. आता बोला. असे कोणी दानशूर हिंदू धर्मिया नाहीत काय? की जे गीतेची प्रत स्वस्तात उपलब्ध करून  देतील.

पण एकंदर संमेलनाने काही लोकांचाच उदौउदो झाला एवढे मात्र नक्की. 

Unknown

No comments: